न्यायालयात फ्रन्ट आॅफिस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:50 AM2017-08-19T00:50:46+5:302017-08-19T00:51:05+5:30

देसाईगंज येथील तालुका न्यायालयाच्या प्रांगणात फ्रन्ट आॅफिस सुरू करण्यात आले असून या आॅफिसचे उद्घाटन दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. सिंघेल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

 Front office in court | न्यायालयात फ्रन्ट आॅफिस सुरू

न्यायालयात फ्रन्ट आॅफिस सुरू

Next
ठळक मुद्देनागरिकांसाठी सोय : न्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देसाईगंज येथील तालुका न्यायालयाच्या प्रांगणात फ्रन्ट आॅफिस सुरू करण्यात आले असून या आॅफिसचे उद्घाटन दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. सिंघेल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी अ‍ॅड. संजय गुरू, अ‍ॅड. वारजुरकर, अ‍ॅड. फुले, अ‍ॅड. मंगेश शेंडे, अ‍ॅड. पिल्लारे, अ‍ॅड. तारिफ अन्वर उपस्थित होते. पक्षकारांना पहिली माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सदर कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायाधीश के. आर. सिंघेल यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना पक्षकारांच्या दृष्टीने या कार्यालयाचे असलेले महत्त्व समजावून सांगितले. यशस्वीतेसाठी कर्मचाºयांनी सहकार्य केले. अनेक नागरिकांना फ्रन्ट आॅफिसचे कार्य माहित नाही. न्यायालयामध्ये येणाºया अनेक पक्षकारांना न्यायालयाबाबतची माहिती देण्यास सदर कार्यालय उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यालय प्रत्येक न्यायालयात गरजेचे आहेत.

Web Title:  Front office in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.