जिल्हा क्षयरोग मुक्त करा - हेमके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:25 AM2018-06-16T00:25:51+5:302018-06-16T00:25:51+5:30

क्षयरोगमुक्त भारत करण्याचे शासनाचे धोरण असून त्यानुसार औषधोपचाराची मोहीम राबविली जात आहे. त्याच धर्तीवर गडचिरोली जिल्हाही क्षयरोग मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सहकार्य करावे, ......

Free the district Tuberculosis - Hemke | जिल्हा क्षयरोग मुक्त करा - हेमके

जिल्हा क्षयरोग मुक्त करा - हेमके

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण : १८ पासून जिल्हाभर क्षयरूग्ण शोध मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : क्षयरोगमुक्त भारत करण्याचे शासनाचे धोरण असून त्यानुसार औषधोपचाराची मोहीम राबविली जात आहे. त्याच धर्तीवर गडचिरोली जिल्हाही क्षयरोग मुक्त करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी केले.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सक्रीय क्षयरोग रूग्ण शोध मोहिमेला १८ जूनपासून सुरूवात होणार असून ही मोहीम ३० जूनपर्यंत चालणार आहे. त्याअनुषंगाने येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या प्रशिक्षण केंद्रात आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व आशांचे प्रशिक्षण शुक्रवार पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रामुख्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येचे अवलोकन करण्यात येणार असून १३ कार्यक्षेत्रात १७५ चमूद्वारे घरोघरी भेटी देण्यात येणार आहे. क्षयरोगाच्या लक्षणाची माहिती देणे, संशयीत क्षयरूग्ण आढळल्यास त्यांचे दोन थुंकू नमुने घेऊन नजिकच्या तपासणी केंद्रात तपासणीसाठी देणे, जंतू आढळल्यास एक्स-रेद्वारे तपासणी करणे, त्यानंतरही आवश्यकतेनुसार सीबीनॅट मशीनद्वारे तपासणी करणे आदी कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर मोहिमेत शोधून काढलेल्या क्षयरूग्णास योग्य वर्गवारीनुसार दैनिक डोजाचे उपचार क्षयरोग अधिकारी कार्यालयामार्फत होणार आहे.

Web Title: Free the district Tuberculosis - Hemke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.