गडचिरोली जिल्ह्यात बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहन उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:44 PM2018-01-20T12:44:38+5:302018-01-20T12:50:38+5:30

धानोरा मार्गावरील माडेतुकुम गावाजवळ महिंद्रा झायलो हे चारचाकी वाहन उलटून गाडीतील ७ जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास झाला.

The four-wheeler vehicle in the Gadchiroli district tried to save the bull | गडचिरोली जिल्ह्यात बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहन उलटले

गडचिरोली जिल्ह्यात बैलाला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकी वाहन उलटले

googlenewsNext
ठळक मुद्दे७ जण किरकोळ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली - धानोरा मार्गावरील माडेतुकुम गावाजवळ महिंद्रा झायलो हे चारचाकी वाहन उलटून गाडीतील ७ जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी ११.३0 वाजताच्या सुमारास झाला.
प्राप्त माहितीनुसार नागपूर जिल्ह्यातील भिवापूर परिसरातील काही लोक एमएच ३६- एच ५०१३ या वाहनाने धानोरा तालुक्यातील खुटगाव येथे आयुर्वेदिक औषधी घेण्यासाठी गेले होते. तेथून परत गडचिरोलीच्या दिशेने येताना भरधाव गाडीसमोर एक बैल आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी उलटली. सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही.

Web Title: The four-wheeler vehicle in the Gadchiroli district tried to save the bull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात