हक्कासाठी एपीआय लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:46 AM2017-12-02T00:46:02+5:302017-12-02T00:46:21+5:30

आंबेडकरवादाचे सिद्धांत, नीती, कार्यक्रम, प्रतिनिधीत्व, व्यक्तीमत्व, नेतृत्व या आधारावर आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडियाची स्थापना करण्यात आली असून ....

The API will fight for the claim | हक्कासाठी एपीआय लढणार

हक्कासाठी एपीआय लढणार

Next
ठळक मुद्देजिल्हा कार्यकारिणी गठित : पदाधिकाºयांची पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आंबेडकरवादाचे सिद्धांत, नीती, कार्यक्रम, प्रतिनिधीत्व, व्यक्तीमत्व, नेतृत्व या आधारावर आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडियाची स्थापना करण्यात आली असून या पक्षाची नोंदणी भारतीय निवडणूक आयोगाकडे ६ डिसेंबर २०१३ रोजी करण्यात आली आहे. मानवाच्या संविधानिक अधिकार व मूलभूत हक्कांसाठी एपीआय ही पार्टी लढा देणार आहे, अशी माहिती एपीआयचे राज्य कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर रंगारी, प्रा. डॉ. रवींद्रनाथ पाटील, प्रा. जे.एच. उराडे आदींनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
आंबेडर राईट पार्टीची गडचिरोली जिल्हा कार्यकारी समिती गठित करण्यात आली असून यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून राजू वाघमारे, सचिव म्हणून राजू तुमरेटी व इतर पदाधिकाºयांचा समावेश आहे. याशिवाय गडचिरोली शहर, गडचिरोली तालुका व युवकांची कार्यकारिणी गठित करण्यात आली असल्याचे पदाधिकाºयांनी यावेळी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात एपीआय नियोजनबद्ध पद्धतीने काम करणार आहे, असेही रंगारी यांनी सांगितले. पत्रपरिषदेला खुशालचंद गेडाम, राजू वाघमारे हजर होते.
 

Web Title: The API will fight for the claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.