५७ जणांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:26 PM2019-02-21T23:26:48+5:302019-02-21T23:27:45+5:30

देसाईगंज येथील दीक्षाभूमीवर रविवारी तथागत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवादरम्यान गडचिरोली परिसरातील मादगी समाजातील सुमारे ५७ नागरिकांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली.

57 people took initiation of Buddhist Dhamma | ५७ जणांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा

५७ जणांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा

Next
ठळक मुद्देदीक्षाभूमीवर कार्यक्रम : मादगी समाजातील नागरिकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज येथील दीक्षाभूमीवर रविवारी तथागत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवादरम्यान गडचिरोली परिसरातील मादगी समाजातील सुमारे ५७ नागरिकांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली.
धम्मराव तानाजु, दीपक बोलीवार, कोमेश्वर बोलीवार, अनिल बोटकावार, खगेंद्र आलेवार यांच्या नेतृत्वात भगन बोडी, हिरापूर, पाथरी, बोदली, डोंगरगाव, जाम, जेप्रा, वाकडी, अनखोडा, येवली, जामगिरी येथील मादगी समाजाच्या नागरिकांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. भंतेनंद यांच्याकडून दीक्षा देण्यात आली. तसेच बुध्दीस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्याकडून २२ प्रतिज्ञा वदवून घेण्यात आल्या. पंचशील मित्र परिवार रामनगर गडचिरोलीचे प्रतिनिधी सिध्दार्थ गोवर्धन, दर्शना मेश्राम, ताराबाई मेश्राम, नागसेन खोब्रागडे, भास्कर मेश्राम यांच्या वतीने नवबौध्दांना वस्त्रदान करण्यात आले. तारका जांभुळकर यांच्या वतीने बुध्द आणि त्याचा धम्म पुस्तक देण्यात आले.
बौध्द धम्म हा शांती व मानवतेची शिकवन देणारा धम्म आहे. आजच्या काळात प्रत्येक मानवाला बौध्द धम्माच्या शिकवणीची गरज आहे. त्यामुळेच मादगी समाजाने बौध्द धम्माची दीक्षा घेतली. मादगी समाजातील इतरही कुटुंब बौध्द धम्माची दीक्षा घेतील, असा आशावाद धम्मराव तानादू यांनी व्यक्त केला.

Web Title: 57 people took initiation of Buddhist Dhamma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.