४३ पुलांमुळे तुटणार संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 12:19 AM2018-07-01T00:19:27+5:302018-07-01T00:20:20+5:30

अपुरे रस्ते आणि ठेंगण्या पुलांमुळे संपर्क तुटण्याचा फटका यावर्षीही अनेक गावांना बसणार आहे. जिल्हाभरात नदी-नाल्यांवरील पुराच्या पाण्याखाली जाणारे ५४ पूल आहेत. मात्र त्यातील ४३ पूल पाण्याखाली गेल्यास पुढील गावांत जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही.

43 Broken contact | ४३ पुलांमुळे तुटणार संपर्क

४३ पुलांमुळे तुटणार संपर्क

Next
ठळक मुद्देपर्यायी मार्गच नाही : २५४ गावातील ७४ हजार नागरिकांना बसणार पावसाचा फटका

मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अपुरे रस्ते आणि ठेंगण्या पुलांमुळे संपर्क तुटण्याचा फटका यावर्षीही अनेक गावांना बसणार आहे. जिल्हाभरात नदी-नाल्यांवरील पुराच्या पाण्याखाली जाणारे ५४ पूल आहेत. मात्र त्यातील ४३ पूल पाण्याखाली गेल्यास पुढील गावांत जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही. याशिवाय काही ठिकाणी नद्या आणि नाल्यांवरच पूलच नाही. परिणामी पावसाळ्यात २५४ गावांमधील ७४ हजार ४९२ नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांची, पुलांची कामे करताना प्रशासनाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. नक्षली त्रासामुळे ही कामे घेण्यासाठी कंत्राटदारही पुढे येत नाहीत. त्यामुळे अनेक रस्ते, पूल मंजूर होऊनही त्यांचे बांधकाम होऊ शकलेले नाही. याचा फटका त्या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून बसत आहे. यावर्षीही २५४ गावांमधील ७४ हजार ४९२ नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार असल्यामुळे त्या गावांत चार महिन्यांचा रेशन पुरवठा, औषधीसाठा पोहोचविण्यात आला आहे.
पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या ६ तालुक्यांमधील गावांमध्ये सर्वाधिक ७६ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल ६० गावे अहेरी तर ५३ गावे भामरागड तालुक्यातील आहेत. या गावांमध्ये नवसंजीवनी योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमधून वाटप केल्या जाणारे तीन ते चार महिन्यांचे साहित्य पोहोचविण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आर.आर.चांदुरकर यांनी सांगितले. त्यात गहू, तांदूळ आणि साखरेचाही समावेश आहे. या संपर्क तुटणाºया गावांमध्ये १२९ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यामुळे काही गावातील नागरिकांना दुसºया गावातील स्वस्त धान्य दुकानांशी जोडण्यात आले आहे.
नागरी जीवनमानावर परिणाम करणाºया जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये गाढवी नदी, कठाणी नदी, कोटरी नदी, पोहार नदी, दिना नदी, इंद्रावती नदी, वटीगंगा नदी, खोब्रागडी नदी, प्राणहिता नदी, तेलनालू नदी, बांडीया नदी या नद्यांसोबत अनेक नाल्यांचा समावेश आहे.
संपर्क तुटणाºया गावांमध्ये पावसाच्या दिवसात उद्भवणाºया संभावित आजारांचा अंदाज घेऊन त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये औषधीचा साठाही पोहोचविण्यात आला आहे.
 

Web Title: 43 Broken contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.