३९ मुस्लीम जोडप्यांचा निकाह

By Admin | Published: December 31, 2015 01:26 AM2015-12-31T01:26:05+5:302015-12-31T01:26:05+5:30

स्थानिक तमाम मुस्लीम जमात देसाईगंजच्या वतीने दरवर्षी सामूहिक निकाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.

39 Muslim couples get married | ३९ मुस्लीम जोडप्यांचा निकाह

३९ मुस्लीम जोडप्यांचा निकाह

googlenewsNext

देसाईगंज येथे कार्यक्रम : ४० हजार नागरिकांची उपस्थिती
देसाईगंज : स्थानिक तमाम मुस्लीम जमात देसाईगंजच्या वतीने दरवर्षी सामूहिक निकाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. बुधवारी सकाळी ११ वाजता येथील मदिना मस्जिद मैदानावर ३९ जोडप्यांचा सामूहिक निकाह लावण्यात आला.
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यासह मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशातून वधू-वर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ३९ जोडप्यांचा निकाह येथे करण्यात आला. लोक वर्गणी उभी करून त्यातून सामूहिक निकाह सोहळा गेल्या पाच वर्षांपासून देसाईगंंज शहरात लावण्यात येत आहे. आतापर्यंत १३५ जोडप्यांचा निकाह लावण्यात आला, अशी माहिती आयोजकांनी यावेळी दिली.
मौलाना कफील अहमद नुरी यांनी सामूहिक निकाहाचा ‘खुतबा’ वाचन केला. तर गडचिरोली येथील हाजी मौलाना मस्तान रिजवी यांनी निकाहासाठी दुआ अदा केला. या कार्यक्रमाला मदीना मस्जिदचे अध्यक्ष खलील खान, मस्जिद गरीब नवाजचे अध्यक्ष मो. गुफरान कुरेशी, इज्तेमाईचे सचिव अ. सलाम शेख, दाऊल उलुम गौसीया मदरसाचे अध्यक्ष मो. अशफाक खान, अहले सुन्नत वल जमातचे अध्यक्ष मकसुद खान पठाण, गरीब नवाज मदरसाचे अध्यक्ष युनूस खानानी, मीर उमेद अली सय्यद, गुरबत ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल कादर कुरेशी, मस्जिद जुनी वडसाचे अध्यक्ष मो. फारूक शेख आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बशीर पटेल कुरेशी यांनी केले. संचालन मिर्जा गुलाम अहमद यांनी केले तर आभार शरीफ खान यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एम. के. मजीद खान, निसार अहमद, नगरसेवक सय्यद आबीद अली, जावेद कुरेशी, सिकंदर खान, आफताब आलम खान, साजीद शेख, नवेद खान, मुशताक शेख, अ. लतीफ शेख, मोहसीन पटेल, सय्यद अजीजुद्दीन, हाजी अ. रऊफ, छोटे मस्जिद शोला, जावेद कुरेशी, सय्यद साजीद, अशफाक खान, इलीयास खानानी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: 39 Muslim couples get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.