दक्षिण आफ्रिकेचा फुटबाॅलपटू ल्यूक फ्लूर्स याची दरोड्यात हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 05:47 AM2024-04-05T05:47:12+5:302024-04-05T05:47:36+5:30

Luke Flores: दक्षिण आफ्रिकेचा फुटबाॅलपटू आणि ऑलिम्पियन ल्यूक फ्लूर्स याची दरोड्याच्या घटनेत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ल्यूकचा क्लब काइजेर चीफ्स यांच्याकडून ही माहिती देण्यात आली.

South African football player Luke Flores was killed in a robbery | दक्षिण आफ्रिकेचा फुटबाॅलपटू ल्यूक फ्लूर्स याची दरोड्यात हत्या

दक्षिण आफ्रिकेचा फुटबाॅलपटू ल्यूक फ्लूर्स याची दरोड्यात हत्या

जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा फुटबाॅलपटू आणि ऑलिम्पियन ल्यूक फ्लूर्स याची दरोड्याच्या घटनेत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ल्यूकचा क्लब काइजेर चीफ्स यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. २४ वर्षीय बचावपटू ल्यू हा हनीड्यू परिसरात पेट्रोल पंपावर रांगेत उभा असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. 

क्लबकडून सांगण्यात आले की, ल्यूक फ्लूर्सची जोहान्सबर्गमध्ये दरोड्याच्या घटनेत बुधवारी रात्री हत्या करण्यात आली. या कठीण प्रसंगात आम्ही त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसाठी सहवेदना व्यक्त करतो. पोलिस प्रवक्ता मावेला मासोंडो यांनी सांगितले की, हल्लेखोर ल्यूकची कार घेऊन फरार झाले आहेत. पोलिस कारची लूट आणि हत्याप्रकरणी तपास करत आहेत. फ्लूर्स टोकयो ऑलिम्पिकमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा सदस्य होता.

Web Title: South African football player Luke Flores was killed in a robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.