Football Fifa World cup 2018 Semi Final Croatia Vs England Live Updates : England and Croatia who makes history to reach finals | Croatia Vs England : क्रोएशियाने रचला इतिहास; इंग्लंडवर 2-1 अशी मात
Croatia Vs England : क्रोएशियाने रचला इतिहास; इंग्लंडवर 2-1 अशी मात

क्रोएशियाने रचला इतिहास; इंग्लंडवर 2-1 अशी मात

रणनीतीची चोख अमंलबजावणी कशी करावी, याचा उत्तम वस्तुपाठ क्रोएशियाने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत दाखवून दिला. इंग्लंडने पाचव्या मिनिटालाच पहिला गोल केला होता. पण तरीही क्रोएशियाचा संघ डगमगला नाही. त्यांनी आपली रणनिती बदलली नाही. दुसऱ्या सत्रात त्यांनी एक गोल करत सामना अतिरीक्त वेळेत नेला. त्यानंतर अतिरिक्त वेळेत इंग्लंडच्या संघाला त्यांनी मानसीकरीत्या हार मानण्यास भाग पाडले. अतिरीक्त वेळेच्या दुसऱ्या सत्रात त्यांनी निर्णायक गोल लगावला आणि सामना 2-1 असा जिंकत इतिहास रचला. फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत क्रोएशियाने पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. 15 जुलैला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत क्रोएशियाचा सामना फ्रान्सशी होणार आहे. इंग्लंडकडून किएरन ट्रीपरने एकमेव गोल केला होता. पण त्यानंतर क्रोएशियाच्या इव्हान पेरिसीकने पहिला गोल केला, त्यानंतर मारिओ मँडझुकिकने 109व्या मिनिटाला दुसरा गोल करत क्रोएशियाला 2-1 असा विजय मिळवून दिला. 

- क्रोएशिया इतिहासामध्ये प्रथमच अंतिम फेरीत

एशिया अंतिम फेरीत दाखल 

क्रोएशियाच्या मारिओ मँडझुकिकने 109व्या मिनिटाला दुसरा गोल केला 

- क्रोएशियाचा दुसरा गोल

क्रोएशियाचा संघ कशी आखतोय रणनीती ते पाहा 

अतिरीक्त वेळेच्या पहिल्या सत्रातही 1-1 अशी बरोबरी कायम

क्रोएशिया आणि इंग्लंड यांची निर्धारीत वेळेत बरोबरी

क्रोएशियाच्या इव्हान पेरिसीकने सामन्याच्या 68 व्या मिनिटाला गोल केला आणि त्यामुळेच त्यांना इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीतील निर्धारीत वेळेत 1-1 अशी बरोबरी करता आली. इंग्लंडच्या ट्रीपरने पहिल्या सत्रात गोल केला होता. त्यामुळे इंग्लंडकडे पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी होती. क्रोएशियाचा संघ तिसऱ्यांदा अतिरीक्त वेळेतील सामना खेळत आहे. यापूर्वी त्यांचे सलग दोन सामने अतिरीक्त वेळेत गेले होते आणि या दोन्ही सामन्यांत क्रोएशियानेच विजय मिळवला होता. 

क्रोएशियाच्या गोलचा हा अफलातून फोटो पाहा

क्रोएशियाकडून इव्हान पेरिसीकचा गोल 

- क्रोएशियाचा 69व्या मिनिटाला गोल

- इंग्लंडच्या गोलचा हा अफलातून फोटो पाहा 

पहिल्या सत्रात इंग्लंडकडे आघाडी कायम

किएरन ट्रीपरच्या गोलच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली होती. ट्रीपरने पाचव्या मिनिटाला फ्री किकच्या संधीचे सोने केले. त्याने केलेल्या गोलच्या जोरावर इंग्लंडला पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेता आली. सामन्याच्या पहिल्या 25 मिनिटांमध्ये इंग्लंडने वर्चस्व राखले होते. त्यानंतर क्रोएशियाच्या संघाने चांगले आक्रमण केले, पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. 

- इंग्लंडच्या केनने गोल करण्याची संधी गमावली

- इंग्लंडला 27व्या मिनिटाला पुन्हा फ्री किक

दोन्ही संघांमध्ये घमासान सुरु 

- इंग्लंडच्या किएरन ट्रीपरने पाचव्या मिनिटाला पहिला गोल केला 

- इंग्लंडचा पाचव्या मिनिटाला पहिला गोल

चौथ्या मिनिटाला इंग्लंडला पहिली फ्री-किक

अंतिम फेरीत पोहोचण्याचा इतिहास कोण रचणार इंग्लंड की क्रोएशिया

मॉस्को : इंग्लंडचा संघ जवळपास 28 वर्षांनी फुटबॉल विशवचषकाच्या उपांत्य फेरीत खेळत आहे, तर दुसरीकडे क्रोएशियाच्या संघाने आतापर्यंत अंतिम फेरीत प्रवेश केलेला नाही. त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यात जो संघ जिंकेल त्याला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी असेल. या सामन्यात दोन खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असतील, त्यामधला पहिला म्हणजे इंग्लंड हॅरी केन आणि दुसरा क्रोएशियाचा लुका मोडरिच. त्यामुळे आपल्या संघाला कोणता खेळाडू अंतिम फेरीत घेऊन जाणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

अशी असेल दोन्ही संघांची रणनीतीउपांत्य फेरीत दोन्ही संघांत असतील हे खेळाडूWeb Title: Football Fifa World cup 2018 Semi Final Croatia Vs England Live Updates : England and Croatia who makes history to reach finals
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.