Fifa World Cup, Brazil : Richarlison चा अफलातून गोल; पाचवेळच्या विजेत्या ब्राझिलची विजयी सुरूवात, पण Neymarची दुखापतीमुळे माघार, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 07:23 AM2022-11-25T07:23:28+5:302022-11-25T07:24:55+5:30

Fifa World Cup, Brazil vs Serbia : पाचवेळच्या विश्वविजेत्या ब्राझिलने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात विजयाने केली.

Fifa World Cup, Brazil : What a goal from Richarlison: Richarlison double helps Brazil outclass Serbia 2-0, Neymar reportedly suffers twisted ankle, Video  | Fifa World Cup, Brazil : Richarlison चा अफलातून गोल; पाचवेळच्या विजेत्या ब्राझिलची विजयी सुरूवात, पण Neymarची दुखापतीमुळे माघार, Video

Fifa World Cup, Brazil : Richarlison चा अफलातून गोल; पाचवेळच्या विजेत्या ब्राझिलची विजयी सुरूवात, पण Neymarची दुखापतीमुळे माघार, Video

Next

Fifa World Cup, Brazil vs Serbia : पाचवेळच्या विश्वविजेत्या ब्राझिलने फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. पण, त्यांचा स्टार खेळाडू नेयमार ( Neymar) याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्यामुळे ब्राझिलच्या चिंतेत भर पडली आहे. सर्बियाविरुद्धच्या सामन्यात रिचार्लिसन ( Richarlison) याने दोन गोल ( ६२ मि. व ७३ मि.) करताना ब्राझिलच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. रिचार्लिसनचा अफलातून गोल या सामन्यात चर्चेचा विषय ठरला.  ब्राझिलने वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीच्या २२ पैकी १७ लढती जिंकल्या आहेत. नेयमार ( २०१४) याच्यानंतर पदार्पणात दोन गोल करणारा रिचार्लिसन हा पहिला ब्राझिलियन खेळाडू ठरला. 

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विश्वविक्रम अन् पोर्तुगालची विजयी सुरूवात; घानाकडून कडवी टक्कर 


१९३४ साली ब्राझिललला स्पेनकडून सलामीच्या सामन्यात १-३ असा पराभव पत्करावा लागला होता आणि त्यानंतर मागील २० वर्ल्ड कप स्पर्धेंत ब्राझील अपराजित आहे. त्यांनी १७ सामने जिंकले आहेत, तर ३  अनिर्णित राखल्या आहेत. या सामन्यात नेयमारकडून ९ फाऊल झाले आणि २०२२च्या वर्ल्ड कपमधील हे सर्वोत्तम फाऊल आहेत.   


Web Title: Fifa World Cup, Brazil : What a goal from Richarlison: Richarlison double helps Brazil outclass Serbia 2-0, Neymar reportedly suffers twisted ankle, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.