Fifa World Cup : इंग्लंडला पहिला विजय चांगलाच महागात पडला; खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सनी ढोसली २० लाखांची दारू 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 10:30 AM2022-11-26T10:30:31+5:302022-11-26T10:30:52+5:30

Fifa World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत १९६६ सालच्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडने दमदार सलामी दिली.

Fifa World Cup 2022 : England’s Wags rack up eye-watering £20,000 bar bill on luxury World Cup cruise liner after three lions beat iran | Fifa World Cup : इंग्लंडला पहिला विजय चांगलाच महागात पडला; खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सनी ढोसली २० लाखांची दारू 

Fifa World Cup : इंग्लंडला पहिला विजय चांगलाच महागात पडला; खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सनी ढोसली २० लाखांची दारू 

Next

Fifa World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत १९६६ सालच्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडने दमदार सलामी दिली. युवा ब्रिगेडच्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर आशियाई चॅम्पियन इराणवर ६-२ असा विजय मिळवला. ज्यूड बेलिंगहॅम, बुकायो साका ( दोन गोल), रहिम स्टर्लिंग,  जॅक ग्रेलिश व मार्कस रॅशफोर्ड या इंग्लंडच्या फ्युचर स्टार्सनी गोल केले. इराणकडून मेहदी तरेमीने दोन गोल केले. पण, इंग्लंडला हा विजय महागात पडला आहे. कतारच्या कठोर नियमांमुळे इंग्लंडने त्यांच्या गर्लफ्रेंडच्या राहण्याची सोय ९ मजली क्रुजवर केली आहे आणि या विजयानंतर त्यांनी सेलिब्रेशन केले. 

गर्लफ्रेंड्ससाठी 'पाण्या'सारखा पैसा; इंग्लंडच्या फुटबॉलपटूंनी बुक केलं ९६८९ कोटींचं हॉटेल, Photo


कतार हा मुस्लिमबहुल देश असल्यामुळे येथे स्त्रियांसाठी आजही अनेक बंधनं आहेत, मद्यपानाला परवानगी नाही. त्यामुळे स्त्रीयांच्या पेहराव्यावरही अनेक निर्बंध आहेत. या नियमांमुळेच इंग्लंडच्या फुटबॉलपटूंच्या पत्नी, गर्लफ्रेंड्स यांच्यासाठी ९ मजली आलीशान बोटच गल्फ ऑफ ओमान येथे उभी करण्यात आली आहे. खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी व गर्लफ्रेंड यांचाही प्रवास आलाच, परंतु त्यांच्यासाठी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंग्लंडकडून खास सोय करण्यात आली आहे. १ बिलियन पाऊंड किंमत ( 96,89,02,81,920.00 भारतीय रक्कम) असलेली आलीशान क्रूझ तैनात ठेवली गेली आहे. 


या क्रूझमध्ये सहा स्विमिंग पूल, सॅलोन, रेस्ट्रॉरंट्, बार आदी सर्व सुविधा आहेत. कतारमध्ये मद्यप्राशनाला बंदी आहे आणि नियम मोडणाऱ्याला कारावास होऊ शकतो. शिवाय महिलांच्या पोशाखावरही अनेक बंधनं असल्यामुळे इंग्लंडने हा मार्ग शोधला आहे. या क्रूजवर ६७६२ गेस्ट राहु शकतील एवढी जागा आहे. इंग्लंडने ६-२ असा विजय मिळवल्यानंतर हॅरी मॅग्युरेची पत्नी फेर्न, जॉर्डन पिकफोर्डची पत्नी मीगन आणि जॅक ग्रिलिशची गर्लफ्रेंड साशा अॅटवूड यांनी मध्यरात्री २ वाजेपर्यंत सेलिब्रेशन केले. The Sun ने दिलेल्या वृत्तानुसार या तिघींनी क्रुजवर खूप दारू प्यायली. त्यांनी शॅम्पेन मागवली आणि त्याचं बिल हे जवळपास २०००० पाऊंड म्हणजे भारतीय रक्कमेत १९ लाख ७४ हजार इतके झाले.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Fifa World Cup 2022 : England’s Wags rack up eye-watering £20,000 bar bill on luxury World Cup cruise liner after three lions beat iran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.