FIFA World Cup 2018 : सामना न खेळताही 'गोल्डन बूट' मिळाला अन् मोहम्मद सलाह हसला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 08:30 PM2018-06-16T20:30:02+5:302018-06-16T20:30:02+5:30

पराभवाने दुखी झालेला स्टार खेळाडू मोहम्मद सलाहला गोल्डन बूट मिळाला आणि त्याच्या चेह-यावर हसू आले. 

FIFA World Cup 2018: The 'Golden Boot' was not played even after the match and Mohammed's advice was laughed! | FIFA World Cup 2018 : सामना न खेळताही 'गोल्डन बूट' मिळाला अन् मोहम्मद सलाह हसला!

FIFA World Cup 2018 : सामना न खेळताही 'गोल्डन बूट' मिळाला अन् मोहम्मद सलाह हसला!

ग्रोंझी (रशिया) : फिफा विश्वचषक सोहळ्याला शानदार सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि.15) इजिप्त आणि उरुग्वे यांच्यात रंगतदार लढत झाली. विश्वचषकातील पहिलाच सामन्यात इजिप्तला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात उरुग्वेने 1-0 अशी इजिप्तवर मात केली. दरम्यान, या पराभवाने दुखी झालेला स्टार खेळाडू मोहम्मद सलाहला गोल्डन बूट मिळाला आणि त्याच्या चेह-यावर हसू आले. 

इजिप्त आणि उरुग्वे यांच्यातील सामन्यात इजिप्तचा स्टार खेळाडू मोहम्मद सलाह याला दुखापत झाल्यामुळे खेळता आले नाही. त्याची अनुपस्थिती सर्वांना जाणवली. विशेष म्हणजे सलाहचा त्याचदिवशी वाढदिवस होता, त्यामुळे तो सामन्याचा आनंद घेत होता. परंतु त्याच्याशिवाय इजिप्तच्या संघातील खेळाडूंनी शानदार खेळी करत उरुग्वेला अखेरच्या क्षणापर्यंत कडवी झुंज दिली. मात्र, शेवटच्या 89 व्या मिनिटाला उरुग्वेने गोल केला आणि विजय मिळवला. त्यामुळे सलाहचा चेहरा पडला. मात्र, त्याच्या पडलेल्या चेह-यावर हसू आणलं ते त्याच्या चाहत्यांनी.  गोल्डन बूट असा डिझाईन केलेला 100 किलोचा केक आणला आणि त्याचा वाढदिवस चाहत्यांनी साजरा केला. यावेळी त्याच्या चेह-यावर हसू पाहयला मिळाले.   

दरम्यान, गेल्या महिन्यात चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्यात खेळताना रिअल माद्रिदचा कर्णधार सर्जिओ रॅमोसने धडक दिल्यामुळे सलाहचा खांद्याला दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे त्याला फिफा विश्‍वचषक सामन्यात खेळता आले नाही. 

Web Title: FIFA World Cup 2018: The 'Golden Boot' was not played even after the match and Mohammed's advice was laughed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.