FIFA Football World Cup 2018 : shocking... गतविजेत्या जर्मनीचे पॅकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 09:42 PM2018-06-27T21:42:11+5:302018-06-27T21:43:36+5:30

दक्षिण कोरियाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला २-० असा परभवाचा धक्का दिला. या विजयाने कोरियाच्या हाती काही लागले नाही, परंतु पराभवाने जर्मनीचे स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले. विश्वचषक इतिहासात  प्रथमच जर्मनीवर ही नामुष्की ओढावली आहे. 

FIFA Football World Cup 2018: The shocking ... defending German popup | FIFA Football World Cup 2018 : shocking... गतविजेत्या जर्मनीचे पॅकअप

FIFA Football World Cup 2018 : shocking... गतविजेत्या जर्मनीचे पॅकअप

Next
ठळक मुद्दे भरपाईवेळेत कोरियाच्या किम यंगवूनच्या गोलने जर्मनीच्या आपेक्षांना सुरुंग लावला. मैदानावरील पंचाने हा गोल ऑफसाईड ठरवला. मात्र व्हिडिओ असिस्टंटपंचानी तो गोल वैध ठरवला.. त्यात भर सन ह्युगमीने आणखी एक गोल करून जर्मनीवर ऎतिहासिक विजय मिळवला.

कझान - दक्षिण कोरियाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला २-० असा परभवाचा धक्का दिला. या विजयाने कोरियाच्या हाती काही लागले नाही, परंतु पराभवाने जर्मनीचे स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले. विश्वचषक इतिहासात  प्रथमच जर्मनीवर ही नामुष्की ओढावली आहे. 

विश्वचषक स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठीच्या महत्वाच्या लढतीत जर्मनीचा संघ प्रचंड दबावाखाली खेळला. स्वीडनविरुद्धच्या विजयी संघातील ५ खेळाडूंना बसवण्याचा निर्णय सर्वांना अचंबित करणारा होता. पण त्याचा फार फरक त्यांच्या खेळावर झाला नाही. दक्षिण कोरियाने गतविजेत्यांना जखडून ठेवले. आक्रमण सुरुवात करताना कोरियन खेळाडूंनी सुरुवातीपासूनच गोल करण्याचे प्रयत्न केले.  कोरियाला यश मिळाले नाही आणि जर्मनीला पहिल्या सत्रात सामना गोलशून्य राखता आला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत जर्मनीला एकदाही पहिल्या सत्रात आघाडी मिळवता आलेली नाही. याआधी १९८६ च्या स्पर्धे त्यांना हे अपयश आले होते. पहिल्या ४५ मिनिटांत कोरियाचा खेळ वरचढ ठरला.

मध्यंतरानंतर जर्मनीने थॉमस म्युलर आणि मारियो गोमेझला पाचारण करताना कोरियावर दडपण वाढवण्याची रणनीती आखली, परंतु त्यांच्याही वाट्याला अपयश आले. ४७ व्या मिनिटाला गोरेत्झकाचा हेडरवरील प्रयत्न कोरियाचा गोलरक्षक जो ह्योनवूने सुरेखरित्या अडवला. त्यामुळे जर्मनीच्या खेळाडूंवरील दडपण अधिक वाढले. गोल कराण्याच्या सोप्या संधीही त्यांना हेरता आल्या नाही. याउलट कोरियन खेळाडूंनी आत्मविश्वासाने खेळ केला.८० व्या मिनिटापर्यंत जर्मनीने गोल करण्याचे १५ प्रयत्न केले. त्यातील चारच प्रयत्न लक्ष्यावर होते आणि कोरियाच्या गोलरक्षकाने ते प्रयत्न योग्यरितीने रोखले. अखेरच्या दहा मिनिटांत गोलप्रयत्नांचा सपाटा अधिक वेगाने वाढला, परंतु पुन्हा एकदा ह्योनवूचे बचावभींत ओलांडण्यात ते अपयशी ठरले. भरपाईवेळेत कोरियाच्या किम यंगवूनच्या गोलने जर्मनीच्या आपेक्षांना सुरुंग लावला. मैदानावरील पंचाने हा गोल ऑफसाईड ठरवला. मात्र व्हिडिओ असिस्टंटपंचानी तो गोल वैध ठरवला.. त्यात भर सन ह्युगमीने आणखी एक गोल करून जर्मनीवर ऎतिहासिक विजय मिळवला.

 

Web Title: FIFA Football World Cup 2018: The shocking ... defending German popup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.