Cristiano Ronaldo's week wages : ख्रिस्तियानो रोनाल्डो आठवड्याला कमावणार ४.८५ कोटी; मँचेस्टर युनायटेडनं केलं मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 09:26 PM2021-08-28T21:26:36+5:302021-08-28T21:27:14+5:30

ख्रिस्तियानो रोनाल्डोनं इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर सिटी क्लबला चकवा देत जुना क्लब मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला

Cristiano Ronaldo's £480k-a-week wages at Man United make him the best paid English Premier League star | Cristiano Ronaldo's week wages : ख्रिस्तियानो रोनाल्डो आठवड्याला कमावणार ४.८५ कोटी; मँचेस्टर युनायटेडनं केलं मालामाल!

Cristiano Ronaldo's week wages : ख्रिस्तियानो रोनाल्डो आठवड्याला कमावणार ४.८५ कोटी; मँचेस्टर युनायटेडनं केलं मालामाल!

Next

ख्रिस्तियानो रोनाल्डोनं इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर सिटी क्लबला चकवा देत जुना क्लब मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. पोर्तुगालच्या सुपरस्टार फुटबॉलपटूनं इटालियन क्लब युव्हेंटससोबतचा करार शुक्रवारी संपुष्टात आणला. ३६ वर्षीय रोनाल्डोनं २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टर युनायटेडसाठी २९२ सामन्यांत ११८ गोल्स केले आहेत आणि आताचा त्याचा निर्णय म्हणजे तो पुन्हा स्वगृही परतत आहे. मँचेस्टर युनायटेडनं नेमक्या किती कोटींमध्ये रोनाल्डोला पुन्हा आपलंसं केलं, याची सर्वांना उत्सुकता होती. Daily Mailनं दिलेल्या माहितीनुसार रोनाल्डोला आठवड्याला £480,000 म्हणजे ४ कोटी ८५ लाख ६०,७७० रुपये युनायटेड देणार आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये ( EPL) आठवड्याला सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूचा मान रोनाल्डोनं पटकावला आहे, परंतु लिओनेल मेस्सी व नेयमार यांच्यापेक्षा ही रक्कम कमीच आहे. ( Cristiano Ronaldo's sensational return to Manchester United will see him earn £480,000-a-week - making him the highest paid player in the Premier League)

रोनाल्डोनं २०१८ साली ला लिगा क्लब रेयाल माद्रिदसोबतचा ९ वर्षांचा प्रवास संपवून युव्हेंटसच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. त्यानं तीन वर्षांत इटालियन क्लबकडून १३४ सामन्यांत १०१ गोल्स केले. रेयाल माद्रिदकडून खेळताना रोनाल्डोनं चार चॅम्पियन्स लीग जेतेपदं आणि दोन ला लिगा ट्रॉफी जिंकल्या. त्याच्या नावावर ३० मोठ्या स्पर्धांची जेतेपदं आहेत. त्यात पाच चॅम्पियन्स लीग, चार फिफा क्लब वर्ल्ड कप, सात इपीएल, स्पेन व इटली येथील जेतेपदं आणि पोर्तुगालकडून एक युरो चषक यांचा समावेश आहे.  

इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये आठवड्याला सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू

  1. ख्रिस्तियानो रोनाल्डो. - 4,85,60,770.42 रुपये
  2. रोमेलू लुकाकू -  4,55,25,722.26 रुपये ( बोनसचा समावेश) 
  3. केव्हीन डी ब्रुयने - 3,89,49,784.60  रुपये 
  4. जॅक ग्रेलिश - 3,84,43,943.25 रुपये
  5. डेव्हिड डी जी - 3,79,38,101.89 रुपये 
  6. पिएरे-एमेरिक औबामेयांग -  3,54,08,895.10 रुपये
  7. रहिम स्टेर्लिंग -  3,03,50,481.51 रुपये  
  8. हेरी केन - 3,03,50,481.51 रुपये
  9. पॉल पोग्बा - 2,93,38,798.79 रुपये
  10. अँथोनी मार्शियल - 2,52,92,067.92  रुपये

 
रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी व ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू नेयमार याला २०१७मध्ये पॅरीस सेंट जर्मेन संघानं करारबद्ध केलं आणि तो आठवड्याला 6,07,00,963.02 कमावतो. नुकताच बार्सिलोनाकडून PSG मध्ये आलेला लिओनेल मेस्सीही आठवड्याला 11,43,20,147.02 इतके कमावतो. 
 

Web Title: Cristiano Ronaldo's £480k-a-week wages at Man United make him the best paid English Premier League star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.