'हा' स्टार फुटबॉलपटू एकाच वेळी दोघींशी बांधणार लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 09:08 AM2018-05-25T09:08:25+5:302018-05-25T09:10:15+5:30

ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो कथित स्वरूपात दोन महिलांशी विवाह करणार असल्यानं पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

Brazil football legend to marry two women at the same time in August | 'हा' स्टार फुटबॉलपटू एकाच वेळी दोघींशी बांधणार लगीनगाठ

'हा' स्टार फुटबॉलपटू एकाच वेळी दोघींशी बांधणार लगीनगाठ

नवी दिल्ली- ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डिनो कथित स्वरूपात दोन महिलांशी विवाह करणार असल्यानं पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मीडिया रिपोर्टनुसार, रोनाल्डिनो यंदाच्या ऑगस्ट महिन्यात प्रेयसी प्रिस्किला कोएलो आणि बीट्रिज सूजा या दोघांशी विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघीही गेल्या वर्षी डिसेंबरपासून रिओ डी जेनेरोमधल्या हवेली येथे रोनाल्डिनोबरोबर राहतात. परंतु रोनाल्डिनोला या निर्णयामुळे कौटुंबिकच नव्हे, तर करिअरमध्येही मोठं नुकसान होऊ शकते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. 

38 वर्षीय रोनाल्डिनो 2016पासून बीट्रिजला डेट करतोय. तर प्रिस्किलाला तो बीट्रिजच्या पूर्वीपासूनच डेट करतोय. दोन्ही महिलांना या स्टार खेळाडूकडून 1500 पाऊंडचा भत्ताही मिळतोय. रोनाल्डिनो स्वतःच्या दोन्ही प्रेयसींशी एकसमान वर्तन करत असून, दोघींनाही सारखंच गिफ्ट देत असतो. त्यानं दोन्ही प्रेयसींना गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात लग्नासंदर्भात विचारलं होतं आणि त्यावेळी साखरपुड्याच्या निमित्तानं अंगठीही भेट दिली होती. रोनाल्डो या दोघींशी रिओमधल्या सांता मोनिका कोंडोमिनियममध्ये लग्न करणार आहे.

रोनाल्डिनो काही निवडक मित्रांना या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करणार आहे. तसेच ब्राझीलचे प्रसिद्ध गायक जॉर्ज वेरसिला या विवाह सोहळ्यात गाणार असल्याचंही समजतंय. या दुहेरी विवाहांमुळे रोनाल्डोला या करिअरमध्ये चांगलीच किंमत मोजावी लागू शकते. खरं तर रोनाल्डोच्या या दोघींशी लग्न करण्याच्या निर्णयाला त्याची बहीण देइसी हिचा विरोध आहे. या विवाह सोहळ्यात ती सहभाग होणार नसल्याचंही तिने आधीच स्पष्ट केलंय. रोनाल्डिनो आता राजकारणात स्वतःचं करिअर आजमावू पाहत आहे. रोनाल्डो लवकरच ब्राझीलमधल्या रिपब्लिक पार्टीत सहभागी होणार आहेत. 

Web Title: Brazil football legend to marry two women at the same time in August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.