इंग्लंड स्पेनपुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:09 AM2017-10-28T04:09:32+5:302017-10-28T04:09:42+5:30

कोलकातामध्ये आज (शनिवारी) इंग्लंड आणि स्पेन संघांदरम्यान फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे.

Able to generate challenge before the England Spain | इंग्लंड स्पेनपुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम

इंग्लंड स्पेनपुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम

Next

गुरप्रीतसिंग संधू लिहितात...
कोलकातामध्ये आज (शनिवारी) इंग्लंड आणि स्पेन संघांदरम्यान फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. या लढतीच्या निमित्ताने भविष्यातील युवा स्टार आपली छाप सोडण्यास सज्ज आहेत. या खेळाडूंनी आपल्या वयाच्या तुलनेत अधिक परिपक्वता दाखविली आहे. मोठे क्लब आणि विदेशातील प्रशिक्षणामुळे मिळालेला अनुभव या जोरावर वयाच्या केवळ १७ व्या वर्षी त्यांच्यात विकसित झालेली क्षमता आश्चर्यचकित करणारी आहे.
इंग्लंडचा संघ मजबूत भासत आहे. विशेषत: आक्रमणातील विविधतेमुळे त्यांना रोखणे कठीण आहे. माझ्या मते हा संघ स्पेनपुढे अडचण निर्माण करू शकतो. इंग्लंडचे खेळाडू वेगवान असून कुठलाही बचाव भेदण्यास सक्षम आहे. अन्य संघांच्या तुलनेत हे खेळाडू उजव्या व डाव्या बगलेचा योग्य पद्धतीने वापर करू शकतात. पण, तंत्राचा विचार केला तर माझ्या मते स्पेनचा संघ दर्जेदार आहे. ४-२-३-१ च्या पोझिशनसह ते चांगली कामगिरी करीत असून या रणनीतीमध्ये बदल करतील, असे वाटत नाही. स्पर्धेच्या वाटचालीसह त्यांच्या कामगिरीचाही आलेख उंचावत केला. स्पेन संघाला आक्रमक खेळ करणे आवडते, पण महत्त्वाच्या लढतीत सुरुवातीला बचावात्मक पवित्रा स्वीकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संघात अनेक वेगवान खेळाडू असून मिडफिल्डमध्ये चेंडूवर ताबा मिळवण्यात तरबेज आहेत. त्याचसोबत प्रदीर्घ काळ चेंडू नियंत्रणात राखण्यात यशस्वी ठरतात.
दरम्यान, स्पेनला मात्र सावधगिरी बाळगावी लागेल कारण, थकवा हे त्यांच्यापुढे सर्वांत मोठे आव्हान राहील. उपांत्य व अंतिम लढतीदरम्यान केवळ दोन दिवसांचा कालावधी मिळाल्यामुळे त्यांना कोलकातातील वातावरणासोबत झटपट जुळवून घ्यावे लागेल. भारत विशाल देश असून प्रवास येथे थकविणारा असतो. त्या तुलनेत इंग्लंडसाठी कोलकाता म्हणजे गृहमैदानाप्रमाणे राहील. कारण या संघाने गोवामध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीचा अपवाद वगळता सर्व सामने कोलकातामध्येच खेळलेले आहेत. इंग्लंडचा ब्रेवस्टर व स्पेनचा रुईज धोकादायक आहेत. या दोघांच्या गोल करण्याच्या क्षमतेव्यतिरिक्त हा सांघिक गेम असल्याचे विसरता येणार नाही. हे दोन्ही खेळाडू केवळ आपली भूमिका बजावू शकतात. ( टीसीएम)

Web Title: Able to generate challenge before the England Spain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.