वजन कमी करायचंय? या बिया खा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 04:42 PM2017-11-14T16:42:46+5:302017-11-14T16:50:44+5:30

वजन कमी करायचं म्हणून फॅन्सी डाएट करण्यापेक्षा आहारात या बियांचा समावेश करा, जास्त तंदुरुस्त व्हाल!

Want to lose weight? Eat these seeds! | वजन कमी करायचंय? या बिया खा!

वजन कमी करायचंय? या बिया खा!

Next
ठळक मुद्देविविध बियांच्या चटण्या हा एक सोपा मार्ग. तोंडीलावणंही, पौष्टिक आहारही!

वजन वाढणं आणि ते कमी करण्यासाठी एकसेएक डाएट करणं हा जगाच्या अंतार्पयत चालणारा विषय आहे. नुस्ती हवा खाल्ली तरी वजन वाढेल असं म्हणणारे तर कितीतरीजण आपल्या अवतीभोवती असतात. सतत वजनकाटा त्यांच्या डोक्यात फिरतो. त्यात आता क्रेझी डाएट्स येतात. सुपरफूड नावानं बर्‍याच पदार्थाची चर्चा होते. आणि एवढं करुन अनेकदा वजन वाढत नाही. पण अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार जर वजन कमी करायचं असेल तर काही बियांचा समावेश आपल्या आहारात करायला हवा. कारण आपल्याला फक्त वजन कमी करायचं आहे. आपलं शरीर पोखरुन काढायचं नाही की, खंगवायचं नाही. शरीराचं पोषण करत वजन कमी करणं हा उत्तम पर्याय. तर त्यासाठी या बियांची मदत होऊ शकते.
मुख्य मुद्दा म्हणजे पूर्वी आपण आहारात अनेक बियांची चटणी खायचो. नुस्त्या भाजून खायचो. पण आता ते करत नाही. अळशी, तीळ, अळीव, कारळं, यांच्या चटण्या खाणंही फार पोषक ठरू शकतं. 

1) भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया भाजीत दिसल्या तरी अनेक बहाद्दर काढून टाकतात. पण या बिया फार पौष्टिक. त्यात मोठय़ा प्रमाणात झिंक असतं. आणि त्या खाल्यानं टेस्टोस्टेरॉन हे होर्मोन वाढीसही मदत होते. त्यातून तुम्हाला मसल  टोन करायचे असतील. मसल बिल्ड करायचे असतील, तुम्ही मसल ट्रेनिंग करत असाल तरी भोपळ्याच्या बिया खाणं उत्तम. 

2) सूर्यफुलाच्या बिया

या बिया लहानपणी अनेकजण सोलून खायचे, भाजून खायचे. आताशा खाणं कमी झालेलं असलं तरी त्या बिया लागतात रुचकर. त्यामुळे सूर्यफुलाच्या बिया खा, आणि मस्त एनर्जी मिळवा.

3) अळशीच्या बिया


नाव जरी अळशी असलं तरी बिया फार कामाच्या. यात भरपूर लोह, प्रोटीन, फायबर असतं. अळशीची चटणी रोज आहारात घेतली तर उत्तम. थंडीत कफ होतो त्यासाठीही अळशीच्या बिया उपयुक्त. त्यामुळे मस्त अळशीची चटणी करा आणि खा! फीट रहा. 

Web Title: Want to lose weight? Eat these seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.