भरीत-पुरी, उपवास मिसळ, रायता अन केक हे उपवासाचे पदार्थ कुठे बाहेर मिळत नाही. हे पदार्थ घरी करता येतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 06:42 PM2017-09-21T18:42:38+5:302017-09-21T18:55:11+5:30

नऊ दिवस दिवसभर उपवास करणं ही सहज गोष्ट नाही. हे उपवास निघतात ते केवळ श्रध्दा, भक्ती आणि उत्साहाच्या बळावरच. यातला उत्साह खूप महत्त्वाचा आहे. हा उत्साह टिकून राहण्यासाठी उपवासाला तुम्ही काय खाता हे खूप महत्त्वाचं आहे.

Try these recipe for this navaratri | भरीत-पुरी, उपवास मिसळ, रायता अन केक हे उपवासाचे पदार्थ कुठे बाहेर मिळत नाही. हे पदार्थ घरी करता येतात.

भरीत-पुरी, उपवास मिसळ, रायता अन केक हे उपवासाचे पदार्थ कुठे बाहेर मिळत नाही. हे पदार्थ घरी करता येतात.

Next
ठळक मुद्दे* सकाळी नाश्त्याला लाडू, ज्यूस, स्मुदी, लस्सी, उपवासाचा केक खाऊ शकता.* दुपारच्या जेवणात कच्च्या केळीचा उपमा, भरीत-पुरी, उपवासाची मिसळ असे विविध पर्याय आहे.* रात्री पचनास हलके पदार्थ घ्यावेत. शक्यतो लिक्विड डाएट घेणं जास्त चांगलं. यामुळे उपवासाच्या काळात पोट बिघडतं नाही, अ‍ॅसिडिटी होत नाही.

 

 


- सारिका पूरकर-गुजराथी


खाण्यापिण्यावर खूप काही अवलंबून असतं. नवरात्रीच्या उपवासाचंही तसंच आहे. नऊ दिवस दिवसभर उपवास करणं ही सहज गोष्ट नाही. हे उपवास निघतात ते केवळ श्रध्दा, भक्ती आणि उत्साहाच्या बळावरच. यातला उत्साह खूप महत्त्वाचा आहे. हा उत्साह टिकून राहण्यासाठी उपवासाला तुम्ही काय खाता हे खूप महत्त्वाचं आहे. रोज तेच तेच पदार्थ खाऊन उबग आला की उपवासाचाही मग कंटाळा यायला लागतो. तो येवू द्यायचा नसेल तर रोज काहीतरी नवीन करायला हवं. त्यासाठी पर्यायाची चिंता नको. हे पर्याय आम्ही तुम्हाला देतोच आहोत.


 

 

 

मंगळवार, दि.26 सप्टेंबर

सकाळचा नाश्ता
मिक्स लाडू :- किसलेला गुळ व काळ्या खजुराची पेस्ट भांड्यात एकत्र करु न मंद आचेवर ठेवा. गुळ वितळला की यात दोन चमचे साजूक तूप,राजगिºयाच्या लाह्या, काजू-बदामाची भरड, भाजलेल्या दाण्यांची भरड घाला. मिश्रण आळले की गॅस बंद करु न लाडू वळून घ्यावेत. या पौष्टिक लाडूबरोबर एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस घ्यावा म्हणजे भरपेट नाश्ता होईल.

दूपारचं जेवण

कच्च्या केळीचा उपमा व रायता :- कच्ची केळी धुवून उकडून घ्यावीत. अगदी लगदा होऊ देऊ नका. नंतर केळी सोलून जाड किसणीवर किसून घ्या. साजूक तूपात जिरे, हिरवी मिरची तडतडवा. त्यात हा किस घालून परतून घ्या. चवीला मीठ, काळीमिरी पावडर, सैंधव मीठ, कोथिंबीर घालून एक वाफ काढा. नंतर यात खोवलेलं ओलं खोबरं घाला. गरमागरम उपमा, मलाईदार दह्याबरोबर सर्व्ह करा. किंवा उपवासाची काकडीची कोशिंबीरही घेऊ शकता. तोंडीलावायला उपवासाचे पापड घ्या.
 

रात्रीचं जेवण

पुदिना ताक :- मिक्सरच्या भांड्यात दही, पुदिन्याची पानं, हिरवी मिरची, सैंधव मीठ, काळीमिरी पावडर, भाजलेल्या जि-याची पावडर, थंड पाणी घालून फिरवून घ्या. पुदिन्याची पानं बारीक झाली पाहिजे. नंतर हे फेसाळलेले ताक गार करु न प्या. दिवसभराचा थकवा तर यामुळे दूर होईलच शिवाय तुमची पचिनक्र या देखील उत्तम राहिल.

बुधवार, दि.27 सप्टेंबर

सकाळचा नाश्ता

बनाना स्मुदी :- दूधात केळ्याचे काप, मध, बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमधून काढून घ्या. हेवी नाश्ता म्हणून हा चांगला पर्याय आहे.

 

 

दूपारचे जेवण

उपवासाची मिसळ :- कढईत साजूक तूप गरम करु न जिरे तडतडून घ्या. यात उकडलेले शेंगदाणे घालून परतून घ्या. यातच उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून आणखी परतून घ्या. मिक्सरमध्ये हिरवी मिरची, ओलं खोबरं, किंचित शेंगदाणे, कोथिंबीरचे वाटण करून घ्या आणि ते यात घालून चांगलं एकत्र करून घ्या. परतल्यावर यात गरजेनुसार पाणी घाला, चवीला मीठ घाला. चांगले उकळू द्या. नंतर यात साबुदाण्याची तयार खिचडी घालून चांगले मिक्स करा. एक उकळी काढा. बाऊलमध्ये ही मिसळ घालून वरून बटाट्याचा तळलेला किस किंवा रेडिमेड चिवडा घाला, चिप्सचे तुकडेही घाला. कोथिंबीर भुरभुरु न मिसळ खा
 

रात्रीचं जेवण

काकडीची लस्सी :- दुपारी मिसळीसारखा दमदार पदार्थ खाल्ल्यावर रात्री जरा हलकच खायला हवं. म्हणून ही लस्सी ट्राय करा. मिक्सरच्या भांड्यात काकडीच्या फोडी, घट्ट सायीचं दही, चवीला मीठ, बर्फाचे तुकडे, गरजेनुसार पाणी घालून फिरवून घ्या. ग्लासात ओतून जिरे पावडर, काळीमिरी पावडर आणि पुदिन्याची पानं घाला.

गुरूवार, दि.28 सप्टेंबर

सकाळचा नाश्ता

उपवासाचा केक :- एका भांड्यात 1/3 कप दही, 1 कप दूध, दोन चमचे मध, 1/4 कप साजूक तूप घेऊन हॅण्ड मिक्सरनं हे मिश्रण चांगले मिक्स करा. यात आता राजगि-याचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ ( दोन्ही अर्धा कप) ( नुसतं राजगिरा पीठही चालेल), 1/4 कप पीठीसाखर, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून हलक्या हातानं मिश्रण मिक्स करु न ओवनमध्ये केक बेक करु न घ्या. केकचे दोन मोठे तुकडे आणि जोडीला गरमागरम कॉफी.
दूपारचं जेवण

भरीत-पुरी :- एका बाऊलमध्ये उकडलेला बटाटा कुस्करु न घ्या. यात आता घट्ट सायीचं दही घाला. चवीनुसार मीठ-साखर घाला. हिरवी मिरची बारीक चिरून किंवा ठेचून घाला. थोडा दाण्याचा कूट घाला. साजूक तूपात      जि-याची फोडणी करून चुरचुरीत फोडणी भरतावर घाला. जोडीला राजगि-याच्या पीठाची किंवा शिंगाड्याच्या पीठाची पुरी खा.

 


 

रात्रीचं जेवण

खजूर मिल्कशेक :- मिक्सरच्या भांड्यात काळ्या खजूराचे बारीक तुकडे, चवीनुसार साखर, सुक्यामेव्याचे तुकडे व दूध घालून फिरवून घ्या. पौष्टिक मिल्कशेक झोपताना घ्या.


शुक्रवार, दि.29 सप्टेंबर

सकाळचा नाश्ता

मिक्स ज्यूस :- दोन सत्र्यांचा ज्यूस काढून बाजूला ठेवा. मिक्सरच्या भांड्यात दीड कप अननसाचे तुकडे, चवीनुसार साखर, काळीमिरी पावडर, बर्फाचे तुकडे, पाणी एकत्र फिरवून घ्या मिश्रण चांगलं मिळून यायला हवं. यात आता संत्र्याचा ज्यूस घालून पुन्हा एकदा फिरवून घ्या.
(नवमीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. आणि हा प्रसाद ग्रहण करु न नऊ दिवसांचे उपवास सोडले जातात. त्यामुळे नवमीसाठी फक्त नाश्त्यावरच थांबतोय. तुमच्या आवडीप्रमाणे वेळापत्रक तुम्ही बदलू शकता. )

 

 

 

Web Title: Try these recipe for this navaratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.