Janmashtami 2019 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ट्राय करा 'या' खास रेसिपी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 03:27 PM2018-09-02T15:27:33+5:302019-08-22T13:24:14+5:30

आज संपूर्ण देश कृष्णमय झाला आहे. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा सण साजरा होत आहे. खरं तर कृष्ण जन्माष्टमीभाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला साजरी करण्यात येते.

Janmashtami 2018 : Janmashtami Special try these tasty sweet dish recipes | Janmashtami 2019 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ट्राय करा 'या' खास रेसिपी!

Janmashtami 2019 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ट्राय करा 'या' खास रेसिपी!

googlenewsNext

आज संपूर्ण देश कृष्णमय झाला आहे. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा सण साजरा होत आहे. खरं तर कृष्ण जन्माष्टमी  भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला साजरी करण्यात येते. परंतु या वर्षी दोन दिवस कृष्ण जन्माष्टमी साजरी करता येणार आहे. जन्माष्टमीला कृष्णाला गोडाधोडाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यासाठी घरामध्ये गोड पदार्थांची रेलचेल असते. त्यासाठी काही हटके पदार्थ आज आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत. तुम्ही जन्माष्टमीनिमित्त नैवेद्यासाठी हे पदार्थ तयार करू शकता. 

रसमलाई

रसमलाई दूध, पनीर, केशर आणि ड्राय फ्रुट्स वापरून  तयार करण्यात येते. स्वाद वाढविण्यासाठी आणि वेगळा रंग आणण्यासाठी यामध्ये केशरही वापरलं जातं. सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. 

रबडी

रबडी हे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. हा पदार्थ दूधापासून तयार करण्यात येतो. त्यामुळे तो शरीरासाठीही लाभदायक असतो. दूध घट्ट होईपर्यंत आटवलं जातं. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि ड्रायफ्रुट्स घालून सर्व्ह करण्यात येतो.

फिरनी

अनेक वर्षांपासून फिरनीचा वेगवेगळ्या सणांच्या पक्वानांमध्ये सामवेश होत असलेला आपण पाहतो. फिरनी खीरीसारखीच असते. पण खीर आपण शेवयांपासून किंवा साबुदाण्याच्या तांदळापासून तयार करतो. तर फिरनी तांदळाच्या कणी पासून तयार केली जाते. 

पेढे

बाजारातून मिठाई विकत आणण्यापेक्षा तुम्ही अगदी सहज पद्धतीने घरी तयार करू शकता. अनेक लोकांना गोड म्हटलं की पेढ्याची आठवण होते. दूध, केसर, ड्राय फ्रुट्स आणि साखर यांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी पेढा तयार करू शकता. 

नारळाचे लाडू

नारळाचे लाडू तोडांत टाकताच विरघळून जातात. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे लाडू तयार करू शकता. 

कलाकंद

जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला नैवेद्य दाखवण्यासाठी दूधापासून तयार केलेल्या गोड पदार्थांचा वापर करण्यात येतो. त्यासाठी कलाकंद हा बेस्ट ऑप्शन आहे. यासाठी क्रिम दूधाचा वापर करण्यात येतो. याव्यतिरिक्त साखर, ड्रायफ्रुट्सही वापरले जातात. त्यासाठी आधी दूध आटवलं जातं. त्यानंतर त्यामध्ये सर्व पदार्थ एकत्र करून थंड होण्यासाठी ठेवलं जातं.  

Web Title: Janmashtami 2018 : Janmashtami Special try these tasty sweet dish recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.