गिरीश बापटांची भविष्यवाणी

By अतुल कुलकर्णी | Published: January 10, 2018 02:52 AM2018-01-10T02:52:07+5:302018-01-10T07:32:15+5:30

सप्रेम नमस्कार. आपल्या स्पष्टवक्तेपणाचे करावे तेवढे कौतुक थोडेच. आपण जे बोलता ते खरं बोलता, रोखठोक बोलून मोकळे होता. त्याच्या परिणामांची पर्वाही आपण करत नाही; हेच तर आपले वैशिष्ट्य. मात्र आपण पुण्यात जे काही बोललात, त्यामुळे देवेंद्रभाऊ चांगलेच हादरले आहेत.

 Girish Bapat's prophecy | गिरीश बापटांची भविष्यवाणी

गिरीश बापटांची भविष्यवाणी

Next

प्रिय गिरीश बापटजी,
सप्रेम नमस्कार. आपल्या स्पष्टवक्तेपणाचे करावे तेवढे कौतुक थोडेच. आपण जे बोलता ते खरं बोलता, रोखठोक बोलून मोकळे होता. त्याच्या परिणामांची पर्वाही आपण करत नाही; हेच तर आपले वैशिष्ट्य. मात्र आपण पुण्यात जे काही बोललात, त्यामुळे देवेंद्रभाऊ चांगलेच हादरले आहेत. पण काँग्रेस, राष्ट्रवादीवाल्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. ‘वर्षभरात सरकार बदलणार आहे... तेव्हा जे काय मागायचं ते आत्ताच मागून घ्या’, असं सांगून आपण विरोधकांना परमानंद तर स्वकीयांना प्रचंड दु:ख दिलंय. आपल्या या स्पष्ट बोलण्यामुळे आपण भाजपातच राहावे की पुन्हा एकदा अजितदादांशी पार्टनरशिप जुळवून घेत राष्ट्रवादीत जावे असा प्रश्न खा. संजय काकडे यांनाही पडल्याचे अंकुश काकडे सॅटरडे क्लबमध्ये सांगत होते. तिकडे रावसाहेब दानवेंना प्रश्न पडलाय की, भाजपामधले काँग्रेसी नेते अशी आपली स्वत:ची ओळख असताना त्यात बापटांची भर कशी काय पडली... अहो नवीन सरकार येणार आहे याचा अर्थ आपलं सरकार येणार नाही असा होतो... आपल्या सरकारने एकापेक्षा एक चांगली कामं केलेली असताना हे असं बोलणं म्हणजे जरा अतीच झालं असं नाही का वाटत तुम्हाला...? आपल्या सरकारने काय नाही केलं...? पृथ्वीराज चव्हाणांनी पुण्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना सगळ्या राज्यभर नेली. त्यांच्याच काळात कोस्टल रोडची घोषणा झाली तीही आपण पुढे नेली. मेट्रो, मोनोची मुहूर्तमेढ पृथ्वीराजांनी रोवली, त्या योजनेला आपण गती दिली. अजितदादांनी पुण्यातल्या मेट्रोची फक्त घोषणा केली होती, आपण ती कृतीत आणली. विविध महामंडळं, समित्या, कमिट्यांच्या सदस्यत्वाची गाजरं दाखवत काँग्रेसवाल्यांनी रिकाम्या ठेवल्या होत्या तसेच आपल्या सरकारनेही केलंय. त्यांनीही या कमिट्या रिकाम्याच ठेवल्यात. नारायण राणेंना गूळ खोबरं देऊन ठेवलंय... खडसेंना देतो म्हणून सांगितलंय. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपदाचं मोठ्ठं गाजर दिलेलं आहे... आणखी काय करायला पाहिजे सांगा बरं... राहता राहिला त्या शेतक-यांना पारदर्शकपणे कर्जमाफी देण्याचा विषय. तो फक्त मागच्या सरकारपेक्षा वेगळा विषय आपल्या देवेनभाऊंनी केला. त्याचा एवढा का राग यावा...? अहो, मागेही तुम्ही असेच एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला होता, ‘‘तुम्ही रात्री कोणत्या क्लिप व्हिडीओवर पाहता हे मला माहितीयं. कारण तुम्ही काय बघता ते मी पण बघतो... असं समजू नका, की आम्ही म्हातारे कोतारे झालो, आम्ही पण अजून तरुण आहोत...’’ आणि त्यावरून राज्यभर देवेनभाऊंना पण लोक विचारत होते, तुम्ही पण तसल्या क्लिप बघता का म्हणून... कुणी म्हणाले की रात्री बेरात्री बीकेसीमधे असणाºया सोफीटेलला आपल्यातले अनेक प्रमुख मंत्री जातात म्हणे... पण असं असलं म्हणून काय झालं. त्यासाठी आपलं सरकार पुन्हा येणार नाही असं म्हणणं काही बरोबर नाही साहेब... असं तर नाही ना, की तुम्हीच आता राज्यात कंटाळून खासदारकीचं तिकीट मागून दिल्लीत जाताय आणि म्हणून इथं कुणाचं सरकार आलं काय आणि गेलं काय? आपल्याला काय त्याचं... असं तर नाही ना... तुम्ही पुण्याचे म्हणून विचारले..!

Web Title:  Girish Bapat's prophecy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.