आवास योजनेतून वसतंय एक शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:46 AM2018-08-08T03:46:44+5:302018-08-08T03:46:49+5:30

एकेक घर मिळून छोटं गाव बनतं. छोट्या गावाचं मोठ्या गावात अन् मोठ्या गावाचं नगरात रूपांतर होतं.

A city in the vicinity of the housing scheme | आवास योजनेतून वसतंय एक शहर

आवास योजनेतून वसतंय एक शहर

googlenewsNext

- बाळासाहेब बोचरे
एकेक घर मिळून छोटं गाव बनतं. छोट्या गावाचं मोठ्या गावात अन् मोठ्या गावाचं नगरात रूपांतर होतं. पण इथं मात्र थेट एक नगरच वसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सोलापुरात राबवला जातो. त्याचं नाव आहे ‘रे नगर’ असंघटित क्षेत्रातील अल्प उत्पन्न गटातील ३० हजार कुटुंबांना घरे देण्याचा प्रकल्प म्हणजे सोलापूरजवळ एक स्वतंत्र नगरच वसविलं जातंय...
एकेक घर मिळून छोटं गाव बनतं. छोट्या गावाचं मोठ्या गावात अन् मोठ्या गावाचं नगरात रूपांतर होतं. पण इथं मात्र थेट एक नगरच वसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सोलापुरात राबवला जातोय. त्याचं नाव आहे, रे नगर. कामगारांच्या हितासाठी काम करणारा मार्क्सवादी पक्ष अजूनही कामगारांच्या विषयापासून दूर गेलेला नाही. सोलापूरचे माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोलापुरातील विडी कामगारांसाठी शासकीय योजनेतून १५ हजार घरांचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी असंघटित क्षेत्रातील अल्प उत्पन्न गटातील ३० हजार कुटुंबांना घरे देण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. पंतप्रधान आवास योजनेतून त्यांनी हा प्रकल्प मंजूर करून आणला असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच सुमारे एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेलं हे स्वतंत्र शहर सोलापूरजवळ अक्कलकोट रोडवर तयार होणार आहे. सोलापूरचं ‘रे नगर’ हे आवास योजनेचं मॉडेल असून या प्रकल्पाचे प्रवर्तक नरसय्या आडम यांना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास लखनौला बोलावून घेतले. प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट सिटी आणि अमृत योजनाअंतर्गत देशभरातील गृहनिर्माण प्रकल्पावर लखनौ येथे कार्यशाळा झाली. त्यामध्ये सोलापूरच्या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. शिवाय या प्रकल्पाचे कौतुक आंतरराष्टÑीय पातळीवरही झाले आहे. नेदरलॅँडमध्ये या गृहनिर्माण प्रकल्पाबद्दल आडम यांना प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अल्प उत्पन्न गटातील कमी शिकलेल्या कामगार वर्गाला कायदेशीर बाबींची पूर्तता करून सवलतीत घर मिळवणे जिकिरीचे असते. अशा एकेका कामगाराला घर मिळवून देता देता आडम मास्तर म्हणजे गोरगरिबांना घरे मिळवून देणारे कामगार नेते म्हणूनच नावारूपाला आले. वास्तविक देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना डाव्या आघाडीच्या या प्रवर्तकाला प्रकल्प मंजुरी मिळवणे म्हणजे सोपे काम नाही. पण नियमावर बोट ठेवून काम करणाऱ्या या नेत्याने सरकारच्या मानगुटीवर बसून प्रकल्प मंजूर करून आणला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या नेत्याच्या चिकाटीचे अन् योजनेचे कौतुक केले. गोदूताई विडी घरकूल प्रकल्प पूर्ण केल्यानंतर मास्तरांकडे घरे मागणाºयांची संख्या वाढली. घर उभं करताना लागणारी कागदपत्रे आणि ती दिली तरी बँक कर्ज देईलच याची शाश्वती नसल्याने हत्बल झालेले शेकडो सापडले. अशा गरजू कामगारांना त्यांनी एकत्र केले. त्यांनी कुंभारीजवळ स्वस्तात जागा विकत घेतली. त्याचे प्लॉट पाडले. गरजू लाभार्थींचे दाखले अन् उतारे गोळा केले. सगळा प्रकल्प बँकेला सादर केला. बँकेने अगदी हसत कर्ज मंजूर केले आणि प्रकल्प सुरू झाला. शे-दोनशे घरे एकत्र करून एखादं खेडेगाव नीटसे वसवणे अवघड असते. तिथे या किमयागाराने ३० हजार घरांची रचना करून ठेवली आहे. एक नगरच वसविलं आहे. ज्यांच्या नशिबी झोपडपट्टीशिवाय दुसरे काही आले नसते. ज्यांना आपले घर होईल की नाही याची आशा नव्हती अशांच्या स्वप्नात आशेचा किरण निर्माण केला आहे. म्हणूनच या वसाहतीला रे नगर असं म्हटलं जातं. कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जाणाºया सोलापूर शहरात रे नगर नावाचं एक मॉडेल शहर आकारला आलंय.

Web Title: A city in the vicinity of the housing scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.