सभापतीपदी युवराज पाटील यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:44 PM2019-02-18T22:44:02+5:302019-02-18T22:45:35+5:30

महापालिका : स्थापनेनंतर १४ व्या सभापतीची निवड, महिला बालकल्याण सभापतीपदी निशा पाटील, उपसभापती वाघ

Yuvraj Patil elected as Speaker | सभापतीपदी युवराज पाटील यांची निवड

dhule

Next

धुळे : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी युवराज पाटील यांची तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी निशा प्रमोद पाटील व उपसभापतीपदी सुमनबाई वाघ यांची बिनविरोध निवड झाली़
शांततेत निवड
मनपा स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापती पदाची निवडणूक सोमवारी पार पडली़ यावेळी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहूल रेखावार, आयुक्त सुधाकर देशमुख, नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते़ स्थायी सभापती निवड प्रक्रियेला सकाळी ११ वाजता सुरूवात झाली़ या पदासाठी विहीत मुदतीत इच्छूक पदाधिकाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते़ त्यानंतर अर्जांची छाननी प्रक्रिया झाली व त्यात अर्ज वैध ठरला. त्यावर हरकत घेण्यासाठी वेळ देण्यात आला मात्र या अर्जांवर कुणीही हरकत घेतली नाही़ त्यानंतर माघारीसाठी रितसर १५ मिनिटांचा वेळ देण्यात येऊन ११़३० वाजता निवड प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली़ या पदासाठी प्रभाग क्र.१४चे नगरसेवक युवराज चैत्राम पाटील यांचाच एकमेव अर्ज असल्याने सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी जाहीर केले. निवडीनंतर जिल्हाधिकारी रेखावार व आयुक्त देशमुख यांनी सभापती युवराज पाटील यांचा सत्कार केला़
त्यानंतर महापौर चंद्रकांत सोनार यांच्या दालनात भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
महिला बालकल्याण सभापती, उपसभापतींची निवड
महिला बालकल्याण समिती सभापती निवडणुकीला दुपारी १ वाजता सुरूवात झाली़
महिला बालकल्याण सभापती पदासाठी निशा प्रमोद पाटील व उपसभापती पदासाठी सुमनबाई वाघ यांचेच प्रत्येक एक अर्ज दाखल झाले होते़ छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरविण्यात आले़ त्यानंतर माघारीसाठी वेळ देण्यात आली़ त्यांनतर जिल्हाधिकारी रेखावार यांनी सभापतीपदी निशा पाटील व उपसभापतीपदी सुमनबाई वाघ यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले़
सभेला अनुपस्थित सदस्य
मनपा स्थायी समिती सभापती व उपसभापती पदासाठी इच्छूक उमेदवार शेख मेहरूनीसा जाकीर, मंगल अर्जून चौधरी, अन्सारी सईदा महम्मद यांनी या सभेकडे पाठ फिरविली होती़ त्यांच्या अनुपस्थितीत ही निवडणूक प्रकिया पार पडली होती़

Web Title: Yuvraj Patil elected as Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे