धुळे येथे भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅली, शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:54 AM2019-05-08T11:54:53+5:302019-05-08T11:55:51+5:30

समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी

Two-wheeler rally, Shobayatra for the birth anniversary of Lord Parashurama at Dhule | धुळे येथे भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅली, शोभायात्रा

धुळे येथे भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅली, शोभायात्रा

Next
ठळक मुद्देधुळ्यात सकाळी दुचाकी रॅली काढलीसायंकाळी शोभायात्रा काढलीदोन्ही मिरवणुकांमध्ये समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी

आॅनलाइन लोकमत
धुळे : ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री परशुराम यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सकाळी दुचाकी रॅली व सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. दुचाकी रॅली व शोभायात्रा रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. शिस्तबद्ध निघालेल्या या रॅलीत व शोभायात्रेत देण्यात आलेल्या घोषणांनी शहर दुमदुमले होते.
बहुभाषिक ब्राह्मण महासंघ
भगवान परशुराभ यांच्या जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे आज मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीच्या सुरवातीला खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी व भगवान परशुराम यांच्या प्रतिमेला अ‍ॅड़माधव प्रसाद वाजपेयी, रत्नाकर रानडे, शेखर कुलकर्णी, अभय नाशिककर , महेश मुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरूवात झाली. ही रॅली मोठा पूल, महात्मा गांधी पुतळा, पारोळा रोड, रतनसिंग चौक या मार्गे श्रीराम मंदिर, आग्रा रोड येथे पोहचली. याठिकाणी अभय नाशिककर, महेश मुळे यांच्या हस्ते भगवान परशुराम व व श्रीराम यांची पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर गणपुले दत्तमंदिर गल्लीनंबर ४ येथे रॅलीचा समारोप झाला.
सायंकाळी शोभायात्रा
परशुराम युवा मंचतर्फे सायंकाळी सहा वाजता ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. मालेगाव रोडवरील येल्लमा मंदिरात सुरवातीला आरती झाली. त्यानंतर शोभायात्रेला सुरूवात झाली. एका सजविलेल्या ट्रॅक्टरवर भगवान परशुराम यांची प्रतिमा ठेवलेली होती.
ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहचली असतांना त्याठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यनंतर ही रॅली पाच कंदिल चौक, सराफ बाजार, रणसिंग चौक, फुलवाला चौकमार्गे महात्मा गांधी पुतळ्याजवळ आली. त्याठिकाणी शोभायात्रेचा समारोप झाला. यावेळी परशुराम युवा मंचचे अध्यक्ष भूषण जोशी, कार्याध्यक्ष अनिल दीक्षित, जयेश वावदे, पी.रा.कुळकर्णी, विनोद मित्तल, प्रशांत वैद्य, अरूण जोशी, नायब तहसीलदार तुषार भट, आदी समाजबांधव उपस्थित होते.

 

Web Title: Two-wheeler rally, Shobayatra for the birth anniversary of Lord Parashurama at Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे