तीन वर्षात राज्यात दोन लाख कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 05:22 PM2017-12-26T17:22:16+5:302017-12-26T17:24:36+5:30

मंत्री चंद्रकांत पाटील : धुळे व नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक

Two lakh crore jobs in the state in three years | तीन वर्षात राज्यात दोन लाख कोटींची कामे

तीन वर्षात राज्यात दोन लाख कोटींची कामे

Next
ठळक मुद्देधुळे व नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक.सव्वा तासाच्या बैठकीत सकारात्मक व चांगले काम करण्याचा मंत्री पाटील यांनी दिला सल्ला. चांगले काम करण्याचे अभियंत्यांना दिले आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :  राज्य शासनातर्फे येत्या तीन वर्षात दोन लाख कोटींच्या रस्त्याची कामे करायची आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत अभियंत्यांनी सकारात्मक विचार ठेऊन काम केले पाहिजे, असा सल्ला महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिला. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक झाली. त्यावेळी  ते बोलत होते. मंचावर मंत्री राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे आदी उपस्थित होते. 
राज्यात गुणवत्तापूर्ण रस्ते तयार व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने येत्या तीन वर्षात राज्यातील रस्त्यांची  १ लाख ६ हजार कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाची ३० हजार कोटी व सहा पदरी रस्त्यांची ५० हजार कोटी व अन्य कामांचा समावेश आहे. शासनातर्फे उत्कृष्ट रस्ते तयार केले जाणार आहेत. कुणीही नावे ठेवणार नाहीत? याची काळजी अभियंत्यांनी घ्यावी, असा सल्ला मंत्री पाटील यांनी दिला. 

Web Title: Two lakh crore jobs in the state in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.