पावसाळ्यात साक्रीकरांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2017 12:09 PM2017-06-24T12:09:40+5:302017-06-24T12:09:40+5:30

नगपंचायत प्रशासनाविरूद्ध नागरिकांनी व्यक्त केला संताप

Time to take water for sale by Sakrikar in rainy season | पावसाळ्यात साक्रीकरांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ

पावसाळ्यात साक्रीकरांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ

Next

 ऑनलाईन लोकमत 

साक्री,दि.24 : शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील कॉलनी परिसरात प्रती 500 रुपये टॅँकर प्रमाणे पाण्याची विक्री होत आहे. नगरपंचायत प्रशासनाला गांभीर्य नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पाणी विकत घेण्याची ज्यांची क्षमता आहे. ते पाणी विकत घेतात. परंतु, जे गोरगरीब आहेत. त्यांचे मात्र, हाल होत आहे. दिवसभर मजुरी करायची आणि रात्री पाण्यासाठी भटकंती करण्याचे प्रकार शहरात सुरू आहे. भर पाण्याच्या शोधात रहायचे. उपलब्ध पाण्याचे योग्य ते नियोजन केल्यास तीन ते चार दिवसाआड पाणी मिळू शकणार आहे. परंतु, तसे न होता. पाणी सोडणारे कर्मचारी त्यांच्या मनमानी पद्धतीने पाणी सोडत असल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Time to take water for sale by Sakrikar in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.