धुळ्यात तुंबळ हाणामारीत तिघे दुखापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 10:49 PM2019-07-21T22:49:29+5:302019-07-21T22:49:51+5:30

संताजी चौक : तलवार, लोखंडी रॉडचा वापर, परस्पर विरोधी फिर्याद

Three injuries in a thumping strain | धुळ्यात तुंबळ हाणामारीत तिघे दुखापती

धुळ्यात तुंबळ हाणामारीत तिघे दुखापती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पूर्ववैमनस्यातून धुळ्यातील संताजी चौकात दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली़ याप्रकरणी शनिवारी रात्री ९ जणांविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ दरम्यान, दुसºया गटानेही रविवारी फिर्याद नोंदविली असून त्यात १० जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़  
आकाश गुजर आणि सिध्दार्थ खैरनार यांच्यात झालेल्या भांडणाच्या कारणावरुन शहरातील किसन बत्तीवाला खुंट तसेच गल्ली नंबर सहाच्या कॉर्नरलगत संताजी चौकात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन गट समोरासमोर आले़ त्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली़ त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने परिसरात तणावचे वातावरण निर्माण झाले होते़ या हाणामारीत सर्रासपणे तलवार, चॉपर आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला़ या हाणामारीत मंगल गिरधर गुजर, आकाश विनोद बडगुजर, रोहिदास तापीराम वानखेडे या तिघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ 
याप्रकरणी मंगल गिरधर गुजर (रा़ गल्ली नंबर ५, घड्याळवाली मशीदजवळ, धुळे) यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास फिर्याद दिली़ त्यानुसार विक्की परदेशी, किरण अहिरे, करण परदेशी, संतोष परदेशी, अर्जुन परदेशी, सिध्दार्थ खैरनार, आकाश साखरे, शुभम तांबट, गणेश वाघारे (कोणाचेही पूर्ण नाव माहिती नाही) (सर्व रा़ धुळे) यांच्या विरोधात भादंवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२५, ५०४, ५०६ सह आर्म अ‍ॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़ 
दुसºया गटातर्फे फिर्याद
संताजी चौक परिसरात झालेल्या हाणामारीप्रकरणी दुसºया गटातर्फे फिर्याद देण्यात आली़ पूर्ववैमनस्यातून लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे़ याप्रकरणी सिध्दार्थ खैरनार याने फिर्याद दिली़ त्यानुसार धर्मदास गुजर, प्रमेय मोरे, सचिन कर्णे, प्रशांत कर्णे, आकाश बडगुजर यांच्यासह १० जणांविरुध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

Web Title: Three injuries in a thumping strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.