धुळ्यात हद्दपारीत दहा गुंडांची मुजोरी थांबविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 01:05 PM2018-03-23T13:05:40+5:302018-03-23T13:05:40+5:30

पोलीस प्रशासन : परवानगी नसताना सर्रास फिरणाºयांना केले जेरबंद, दाखविली तुरुंगाची हवा

Ten handkerchiefs stopped in Dhule! | धुळ्यात हद्दपारीत दहा गुंडांची मुजोरी थांबविली!

धुळ्यात हद्दपारीत दहा गुंडांची मुजोरी थांबविली!

Next
ठळक मुद्देही कामगिरी संबंधित स्टेशनचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे राबविली आहे़सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षितता वाटावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वातोपरी प्रयत्न केले जातात़ त्याचाच एक भाग म्हणून हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला जातो आणि त्याला मंजुरी देवून त्याची अंमलबजावणी केली जात असते़ मागील वर्षात २० ते २५ जणांच्या हद्दपारीचा पदिनू डॉन उर्फ दिनेश निंबा गायकवाड याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दारुसंदर्भातील गुन्हे दाखल झाल्याने त्याला स्थानबद्ध करण्यात आले़ त्याची रवानगी नाशिक कारागृहात झालेली आहे़  हद्दपार असूनही शहरात फिरणारे धुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील यशवंत बागुल, मनोहर बैसाणे, सोनू पवार, मिलींद आवटे आणि आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विक्की महादेव परदेशी, भूपेंद्र अशोक मोरे, मनोज वाडीले, निरज उर्फ बंटी रमेश जोशी, वसीम जैनुद्दीन शेख, पव

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : हद्दपार करुनही सर्रासपणे फिरणाºया गुंडांच्या मुसक्या आवळण्यास धुळे पोलिसांनी सुरुवात केली आहे़ या महिना दीड महिन्याभरात १० जणांना शिताफीने पकडले़ दरम्यान, हद्दपार असूनही फिरणाºया गुंडांवर पोलिसांचा वॉच असल्याचे सांगण्यात आले़ या धडक मोहिमेमुळे गुंडांचे धाबे दणाणले आहे़
पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार आणि प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी आपल्या स्तरावर त्रासदायक ठरणाºया काही गुंडांना धुळे शहराससह शेजारील जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे़ तरीदेखील काही गुंड हे सर्रासपणे शहरात फिरत असल्याचे समोर येत आहे़ या अनुषंगाने शहरात बिनधास्त फिरणाºया गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी दिले होते़ त्या अनुषंगाने पोलिसांनी अशा गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केलेली आहे़ 
गुंडांना हद्दपार करण्याची मोहिम वेळोवेळी राबविण्यात येत असते़ काहींना ३ महिने, काहींना ६ महिने़ काहींना १ तर काहींना २ वर्षासाठी हद्दपार करण्याची तरतूद आहे़ या तरतुदीनुसार गुंडांना हद्दपार करण्यात आले़ तसे त्यांना लेखी आदेश देवून शहरात येण्यासाठी रितसर परवानगी घेण्याचे देखील सूचित करण्यात आले़ असे असूनही कोणाचीही मुलाईजा न बाळगता, भीती न ठेवता सर्रासपणे गुंड शहरात फिरत होते़ 
नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी हद्दपारीत गुंडांना पुन्हा पकडून जेरबंद करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांना दिलेल्या होत्या़ त्या सूचनांची अंमलबजावणी करत संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांना गुंडांना जेरबंद करण्याचे आदेशित करण्यात आले़ त्यानुसार अंमलबजावणी देखील करण्यात सुरुवात झाली़ १० जणांना जेरबंद करण्यात आले़ 

Web Title: Ten handkerchiefs stopped in Dhule!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.