धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 06:29 PM2018-04-21T18:29:09+5:302018-04-21T18:29:09+5:30

श्रद्धास्थाने पाडून दिशाभूल : जुन्या धुळ्यातील रहिवाशांतर्फे निषेध 

The symbolic combustion of the statue of Dhule city MLA Anil Gote | धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन 

धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन 

Next
ठळक मुद्देश्रद्धास्थाने पाडून दिशाभूल केल्याप्रकरणी निषेध पुतळा दहनापूर्वी काढलेल्या प्रतीकात्मक अंत्ययात्रेने वेधले नागरिकांचे लक्ष नेताजी सुभाष पुतळा चौकात केले पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन 

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील पांझरा नदीकाठी दोन्ही बाजूला होत असलेल्या समांतर रस्त्यांसाठी जुने धुळे भागातील विविध मंदिरे पाडून त्याबद्दल दिशाभूल केल्याचा निषेध म्हणून तेथील रहिवाशांनी धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या पुतळ्याचे नेताजी सुभाष पुतळा चौकात प्रतीकात्मक दहन केले. तत्पूर्वी जुने धुळे परिसरातून पुतळ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. 
शहरातील पांझरा नदीकाठी सुरू असलेल्या अकरा किमीच्या रस्त्यांना अडथळा ठरणारी जुने धुळे परिसरातील अतिक्रमणे गेल्या सोमवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली़ धार्मिक स्थळांसह लिंगायत समाज स्मशानभूमीचा त्यात समावेश होता़
 आमदार अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून शहरात पांझरा नदीकाठच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी साडेपाच किमीच्या रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत़ या रस्त्यांच्या कामांना अडथळा ठरणारी जुने धुळे परिसरातील स्मशानभूमी व मंदिर, छोटी मंदीरे, थडगे आदी हटविण्यात आले़ 
यावेळी मनोज जाधव, जितेंद्र माळी, विक्की बोरसे, भटू चौधरी, किरण मराठे, हरीश सूर्यवंशी, शंभू माळी, प्रथमेश काळे, मंथन ठाकूर, भरत माळी, रावसाहेब माळी आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. तरुणांची संख्या लक्षणीय होती. 
जुने धुळे परिसरातून पुतळ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. त्यामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. या मुद्यावर जुने धुळे परिसरात रोष असून तो विविध मार्गांनी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

Web Title: The symbolic combustion of the statue of Dhule city MLA Anil Gote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.