धुळे हत्याकांडातील संशयितांना जळगावातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 10:10 PM2018-06-09T22:10:09+5:302018-06-09T22:10:09+5:30

धुळे येथील रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव या पिता-पुत्राच्या हत्या प्रकरणातील संशयित ऋषीकेश वानखेडे (वय २२, रा.वानखेडे नगर, धुळे ) व वैभव पवार (वय २६, रा.देवपूर, धुळे) या दोघांना जळगावच्या पोलिसांनी शनिवारी सायंकाळी खोटे नगरातून ताब्यात घेतले.

The suspects arrested in the Dhule murder case are arrested from Jalgaon | धुळे हत्याकांडातील संशयितांना जळगावातून अटक

धुळे हत्याकांडातील संशयितांना जळगावातून अटक

Next
ठळक मुद्देजळगाव पोलिसांची कामगिरीखोटे नगरात मित्राच्या घरुन घेतले ताब्यातधुळे पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव : धुळे येथील रावसाहेब पाटील व त्यांचा मुलगा वैभव या पिता-पुत्राच्या हत्या प्रकरणातील संशयित ऋषीकेश वानखेडे (वय २२, रा.वानखेडे नगर, धुळे ) व वैभव पवार (वय २६, रा.देवपूर, धुळे) या दोघांना जळगावच्या पोलिसांनी शनिवारी सायंकाळी खोटे नगरातून ताब्यात घेतले.
धुळे येथे वानखेडे नगरात रोहीदास पाटील व मुलगा वैभव या दोघांवर शुक्रवारी सायंकाळी तलवार, चॉपर व धारदार शस्त्राने काही जणांनी हल्ला चढविला होता. दोघांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. यात एक कामगारही जखमी झाला होता. त्यामुळे मारेकऱ्यांविरुध्द धुळे पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. हल्लयानंतर दोन्ही संशयित फरार झाले होते.

Web Title: The suspects arrested in the Dhule murder case are arrested from Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.