साक्रीतील डॉक्टरने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 05:04 PM2018-09-13T17:04:10+5:302018-09-13T17:05:44+5:30

कारण गुलदस्त्यात : विषारी औषधाचे इंजेक्शन घेतले

Suicide committed by a doctor in Sakri | साक्रीतील डॉक्टरने केली आत्महत्या

साक्रीतील डॉक्टरने केली आत्महत्या

Next
ठळक मुद्देसाक्रीत तरुण डॉक्टराची आत्महत्याघटनेमागचे कारण गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : शहरातील  २९ वर्षीय एम.डी. डॉ.पराग खैरनार यांनी विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरासह तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. असे का घडले असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
शहरातील नागरिकांना डॉ.डी.डी. खैरनार हे सुपरिचित नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षापासून शहरात दवाखाना चालवित  वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांचा मुलगा डॉ.पराग खैरनार यांनी एमडी (मेडिसिन) झाल्यानंतर वडलांच्या पाऊलावर पाऊल ठेवीत शहरातच सेवा देण्याचा मानस व्यक्त केला.  त्याप्रमाणे त्यांनी शहरातील महामार्गालगत असलेले डॉ.शिंदे  यांचे हॉस्पीटल भाडेतत्वावर घेतले. २ सप्टेंबर रोजी त्या हॉस्पीटलचा शुभारंभ करण्यात आला. गुरुवारी पहाटे डॉ. पराग  हॉस्पीटलमध्ये पेशंट तपासायचे असे सांगून भाडणे रोडवरील आपल्या राहत्या घरातून कारने निघाले. हॉस्पीटलमध्ये गेल्यानंतर लवकर न परतल्याने हॉस्पीटलमध्ये चौकशी केली असता ते हॉस्पीटलमध्ये आले नसल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. तेव्हा डॉ.पराग यांची सर्वत्र शोधाशोध सुरु झाली.  तेव्हा शेवाळी गावाजवळ  महामार्गावर बायपास रस्त्यावर ते कारमध्ये मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर दुपारी धुळ्यातील शासकीय रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन  करण्यात आले. नंतर  मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. नंतर सायंकाळी उशीरा त्यांच्या राहत्या गावी विटाई येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दोन दिवसात विवाह ठरणार होतामयत डॉ.पराग खैरनार हे अविवाहित होते.  हॉस्पीटल सुरु झाल्यानंतर  ४ आॅक्टोबरला त्यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतरगणेश चतुर्थीच्या दोन दिवसानंतर त्यांचा विवाह ठरणार होता. त्यांची होणारी पत्नी सुद्धा एम.डी.(पॅथॉलॉजी) होती. डॉ. पराग यांचा लहान भाऊ नितीन हा कºहाड येथे एम.एस. चा अभ्यास करीत आहे. बहिण एम.बी.बी.एस. झालेली आहे.

Web Title: Suicide committed by a doctor in Sakri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.