दगडातून विविध मूर्ती घडविणारा अवलिया़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:49 PM2019-03-18T22:49:26+5:302019-03-18T22:49:56+5:30

साक्री। रक्ताचे पाणी करुन घाम गाळून अनेक भक्तांना ईश्वर पूजनाचा मार्ग दाखविणारा बाळू चव्हाण

The statue of various figures from the stone | दगडातून विविध मूर्ती घडविणारा अवलिया़

दगडातून विविध मूर्ती घडविणारा अवलिया़

Next

संडे हटके बातमी
आबा सोनवणे । 
लोकमत न्यूज नेटवर्क 
साक्री :  ईश्वराच्या मूर्ती पूजनाने सर्व प्रकारच्या सुखाची पूर्ती होते़ परंतु त्याच ईश्वराच्या मुर्तीला तयार करण्यासाठी किती घाम गाळावा लागतो, असेच घाव दगडावर घालत गेल्या १५ वर्षापासून रक्ताचे पाणी करून घाम गाळून अनेक भक्तांना ईश्वर पूजनाचा मार्ग दाखवणारे साक्री येथील बाळू चव्हाण अनेक देवांच्या मूर्तीचे निर्माते आहेत़ 
घणाचे गाव सोसल्याशिवाय दगडाला आणि देवालाही देवपण येत नाही असे म्हणतात़ जो देव भक्तीने मिळवता येतो तर कोणी भक्ती आणि शक्तीने देवाला तयार करतो़ तिथूनच खºया अर्थाने भक्तीचा दरवाजा उघडतो़ भक्ती आणि शक्तीच्या सहयोगातून कुणाला भौतिक सुख तर कोणाला ऐहिक सुख मिळते़ ईश्वराच्या मूर्ती पूजनाने सर्व प्रकारच्या सुखाची पूर्ती होते़ परंतु त्याच ईश्वराच्या मुर्तीला तयार करण्यासाठी किती घाम गाळावा लागतो! असेच घाव दगडावर घालत गेल्या १५ वर्षापासून रक्ताचे पाणी करून घाम गाळून अनेक भक्तांना ईश्वर पूजनाचा मार्ग दाखवणारे साक्री येथील बाळू चव्हाण अनेक देवांच्या मूर्तीचे निर्माते आहेत़ 
ज्या ईश्वराने  मानवाला जन्म दिला, आकार दिला त्याच ईश्वराला बाळू चव्हाण घणाचे घाव घालून घडवतो़ आकार देतो़ त्या दगडाच्या मूर्तीला कोणी कृष्ण, कोणी हनुमान, तर कोणी महादेव म्हणतो़ तर कोणी आपल्या पूर्वजांना मुंजोबा, पीरच्या रूपाने पाहतात. 
काल-परवापर्यंत पाषाणाच्या रूपात असलेल्या दगडाला ईश्वराचे रूप प्राप्त करण्याचे काम बबलू चव्हाण व त्यांची पत्नी धनश्री करत आहेत़ दगडाची मूर्ती घडवून पाच जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ ते चालवतात़ त्यांच्या प्रत्येक घणाच्या गावात ईश्वराची शक्ती आणि भक्ती आहे़ दगडावर पडलेल्या प्रत्येक घाव  हनुमान चालीसा आहे, तोच घाव गायत्री मंत्र आहे आणि तोच घाव ओमकारसुद्धा आहे. चारधामची यात्रा करून ईश्वर प्राप्ती होते, असे म्हणतात़ ही यात्रा करणेही  काहींना शक्य होते, काहींना शक्य होत नाही़ अशा भाविकांसाठी ईश्वराने कदाचित बाळू चव्हाण यांच्या रूपाने दगडात चारधाम तयार करण्याचे कार्य सोपवले असावे, असे संकेत आहेत़ 
गेल्या १५ वषार्पासून चव्हाण रस्त्याच्या कडेला तंबू टाकून आपल्या कुटुंबासह राहतात़ डोंगरदºयातून मोठे पाषाण आणून टाकी आणि घणाच्या सहाय्याने तो आॅर्डर प्रमाणे देव घडवतो आणि आपला चरितार्थ चालवतो़ यासाठी त्याची पत्नी धनश्री हिची मदत त्याला होते़ तर त्याचे लहान मुले ज्यांना देव काय असतो हे अजून पुरेशी माहित नसताना ते देवांचे डोळे केस रंगवतात़ यातून त्यांना वर्षभरात तीस ते चाळीस हजार रुपयांची कमाई होते़ यावरच त्यांचा संसाराचा गाडा चालतोय. 
तसेच त्याला काही वेळेस दैनंदिन गरजा भागविताना, संसाराचा गाडा ओढताना अतोनात त्रास होतो़ आर्थिक चणचण देखील भासते़ असे असूनही त्याने या व्यवसायाकडे अद्याप दुर्लक्ष केलेले नाही़ 
मिळणाºया पैशांतून त्यांचे आनंदी जीवन 
गेल्या १५ वषार्पासून चव्हाण रस्त्याच्या कडेला तंबू टाकून आपल्या कुटुंबासह राहतात़ डोंगर दºयातून मोठे पाषाण आणून टाकी आणि घणाच्या सहाय्याने तो मागणीप्रमाणे देव घडवतो आणि आपला चरितार्थ चालवतो़ विशेष म्हणजे या कामातून मिळणाºया पैशांत त्यांचे कुटुंब आनंदाने जीवन जगत आहे़ 

Web Title: The statue of various figures from the stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे