जैताणे येथे ग्रामदैवत आई भवानीदेवी यात्रोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:40 PM2019-02-17T22:40:47+5:302019-02-17T22:41:46+5:30

शतकभरापासून याठिकाणी यात्रेचे आयोजन

Start of Gramadawat I Bhavnadevi Yatra at Jaitane | जैताणे येथे ग्रामदैवत आई भवानीदेवी यात्रोत्सवास प्रारंभ

dhule

googlenewsNext

जैताणे : येथील ग्रामदैवत आई भवानी मातेच्या यात्रौत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी हजारो भाविकांनी यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
जैताणे येथील गावाच्या पूवेर्ला रोहिणी नदीच्या काठावर १९३६ पासून आई भवानी मातेचे मंदिर आहे. गेल्या जवळपास शतकभरापासून याठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात येते.
यात्रेत बालगोपालांसाठी आकर्षण असलेल्या पाळणा, जायंट व्हील, कटलरीे, संसारोपयोगी वस्तुच्या विक्रीची आणि मिठाईची दुकाने लागली आहे.
यात्रोत्सवाची तयारी उपसरपंच नवल खैरनार, शांतीलाल भदाणे, पंकज सोनावणे यांच्यासह इतर मंडळीने परिश्रम घेतले.
परिसरातील ५० ते ५५ गाव पाड्यांवरील भाविक यात्रेच्या निमित्ताने हजेरी लावत असतात. यात्रेचा शुभारंभ रविवारी झाला. रात्री सोपणभाऊ दोनगावकर यांचा लोकनाटय तमाशाचा कार्यक्रम झाला.
सोमवारी यात्रेकरूंसाठी पर्वणी असणाऱ्या तमाशा या लोककलेचा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी परिसरातील बळीराजा नावसपूतीर्साठी आई भवानी मातेला सजवलेले तागताराव आणत असतात .ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळून या तगतरावांचे स्वागत मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात येणार आहे. यात्रा दोन दिवस भरते. दोन दिवसात लाखोंची आर्थिक उलाढाल होत असते. पहिल्या दिवशी नवस फेडणाºयांचीही गर्दी होती.
मात्र यंदा दुष्काळामुळे यात्रेवर त्याचे सावट दिसून आले. पहिल्या दिवशी अपेक्षित अशी गर्दी झाली नव्हती.

Web Title: Start of Gramadawat I Bhavnadevi Yatra at Jaitane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे