महामार्गावर एसटी व दुचाकी अपघात, बाप-बेटा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:50 PM2019-06-01T13:50:07+5:302019-06-01T13:50:33+5:30

सरवड फाटा : रस्ता ओलांडताना झाली दुर्घटना

ST and bicycle accident on highway, father-son killed | महामार्गावर एसटी व दुचाकी अपघात, बाप-बेटा ठार

महामार्गावर एसटी व दुचाकी अपघात, बाप-बेटा ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सरवडनजिक रस्ता ओलांडणाºया दुचाकीला एसटी बसची जोरदार धडक बसल्याने बाप-बेटा ठार झाल्याची दुर्घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़ 
एमएच १८ एएल ६१७९ क्रमांकाच्या दुचाकीने वसंत राजाराम भील (४०) आणि त्यांचा मुलगा श्याम वसंत भील (१२) हे दोघे कापडणे येथून सरवडला लग्नासाठी जात होते़ दुपारी १२ वाजेच्या सुमारास दुचाकीने रस्ता ओलांडत असतानाच शिरपूरकडून धुळ्याकडे येणारी एमएच १४ बीटी २२१८ क्रमांकाच्या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ या अपघातात बाप-बेट्याला जबर दुखापत झाली़ परिणामी त्यांचा मृत्यू ओढवला आहे़

Web Title: ST and bicycle accident on highway, father-son killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे