धुळे शहरातील एस. एस. व्ही.पी. एस. महाविद्यालयात तरुणाईची धमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:59 PM2018-01-31T14:59:22+5:302018-01-31T15:00:13+5:30

कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील : युवारंग युवक महोत्सव; कलाविष्काराला मान्यवर, रसिकांची दाद

s.s.v.p.s. college cultural event in dhule | धुळे शहरातील एस. एस. व्ही.पी. एस. महाविद्यालयात तरुणाईची धमाल

धुळे शहरातील एस. एस. व्ही.पी. एस. महाविद्यालयात तरुणाईची धमाल

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थी हिताच्या दृष्टीने उत्तर महाराष्टÑ विद्यापीठातर्फे ४२ प्र्रकाराच्या योजना राबविल्या जात आहेत. येवढ्या योजना राबविणारे विद्यापीठ हे राज्यात एकमेव आहे. परंतु, या योजनांचा उपयोग विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा, असे मत युवक महोत्सवाचे कार्याध्यक्ष दिलीप रामू पाटील यांनी येथे सांगितले. ते पुढे म्हणाले की युवक महोत्सवात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहे. परंतु, त्यांच्या उत्साहावर विरजण पडणार नाही. याची काळजी विविध कला प्रकारात सहभागी न होणाºया विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे त्यांनी येथे म्हटले.

आॅनलाईन न्यूज नेटवर्क 
धुळे :  उत्तर महाराष्टÑ विद्यापीठातर्फे यापूर्वी केंद्रस्तरीय युवारंग महोत्सव होत होता. परंतु, गेल्या काही वर्षात या महोत्सवात काही विशिष्ट महाविद्यालयांचे विद्यार्थी जिंंकायचे. परिणामी, खान्देशातील  आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी चांगले कलागुण असूनदेखील त्यांना पारितोषिक मिळत नव्हते. या विचाराने उमविने जिल्हास्तरीय युवक महोत्सव घेण्याचे ठरविले. त्या माध्यमातून आदिवासी व ग्रामीण भागातूनही चांगले कलावंत घडू शकतात, अशी आशा उमविचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांनी येथे व्यक्त केली. दरम्यान, येथे आयोजित युवारंग युवक महोत्सवात तरुणांनी त्यांच्यातील उत्कृष्ट कलाविष्कार सादर करीत धमाल केली. 
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ व श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे भाऊसाहेब ना. स. पाटील साहित्य व मु. फि. मु. अ. वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवारंग युवक महोत्सव २०१७-२०१८ चा कार्यक्रम बुधवारी एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयाच्या सभागृहात  झाला. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मंचावर युवक महोत्सवाचे कार्याध्यक्ष दिलीप रामू पाटील, एन. मुक्टोचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय सोनवणे, युवारंग युवक महोत्सवाचे निरीक्षक प्रा. डॉ. सत्यजित साळवे, प्रा. विलास चव्हाण, उमविचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, सिनेट सदस्य नितीन ठाकूर, अमोल मराठे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, एन. संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील, विद्यापीठ विद्यार्थिनी प्रतिनिधी अश्विनी पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर  एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालयातील विद्यार्थ्याने ईशस्तवन सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांनी केले.  सूत्रसंचालन डॉ. अश्पाक सिलकगर यांनी केले. 
जिल्हास्तरीय युवक महोत्सवामुळे मुलींचा सहभाग वाढला 
कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, की  पूर्वी केंद्रीय युवक महोत्सवात दोन ते अडीच हजार विद्यार्थी सहभागी होत होते. या सर्व विद्यार्थ्यांना सांभाळताना आयोजकांची मोठी अडचण होत होती. तसेच बाहेरच्या जिल्ह्यात मुलींना त्यांचे पालक पाच दिवसही सोडत नव्हते. परंतु, जिल्हास्तरीय युवक महोत्सवामुळे सकाळी गेलेली आपली मुलगी सायंकाळी घरी परत येणार या विचाराने या महोत्सवात मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे विद्यापीठाने जिल्हास्तरीय युवक महोत्सव घेण्याचा निर्णय योग्यच ठरला. 
साहित्यिक व कलावंत समाजाला दिशा देण्याचे काम करतात 
केंद्रस्तरीय युवक महोत्सवात पारितोषिक न मिळाल्याने ग्रामीण भागातून आलेली मुले हताश व्हायची. परंतु, आता जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक जरी एखाद्या संघाने मिळविला तरी त्याचा आनंद मुलांना राहणार आहे. समाजात असलेले साहित्यिक व कलावंत हे समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात. त्यामुळे या महोत्सवात सहभागी झालेल्या कलावंतांनी कुठेही गालबोट लागणार नाही; याची काळजी घेतली पाहिजे. तसेच महोत्सवात सहभागी कलावंतांनी  उत्कृष्ट कलाविष्कार सादर करावेत, असे आवाहन कुलगुरू डॉ. पाटील यांनी येथे केले. 
ग्रामीण भागातील कलावंतांना संधी 
युवारंग युवक महोत्सवात आज धुळे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील कलावंत त्यांचे कलाविष्कार सादर करणार आहेत. ग्रामीण भागातील कलावंतांमध्ये असलेले कलागुण या माध्यमातून समोर येणार आहेत. येथे कलावंतांना उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठामुळे चांगले कलावंत घडतील, घडणार असल्याचे युवारंग युवक महोत्सव समितीचे निरीक्षक डॉ. सत्यजित साळवे यांनी येथे केले. 
जोश करा; पण होश ठेवा 
आजचा दिवस हा खºया अर्थाने तरुणांचा आहे. सर्व कलाविष्कारांसाठी तरुणांनी जोश ठेवा. मज्जा  व धमाल करा. पण हे करत असताना होश कायम ठेवा. एस. एस. व्ही. पी. एस. संस्थेला १०९ वर्ष पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा महोत्सव यशस्वी करायचा आहे. गालबोट लागणार नाही; याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी येथे केले. 

Web Title: s.s.v.p.s. college cultural event in dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.