अल्प मुदतीच्या पिकांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:55 PM2019-03-26T22:55:33+5:302019-03-26T22:56:25+5:30

कापडणे : पाणीटंचाईमुळे शेपा व पालक भाजीवर्गीय पिक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Short-term cultivation | अल्प मुदतीच्या पिकांची लागवड

dhule

googlenewsNext

कापडणे : कापडणेसह परिसरात सलग तीन ते चार वर्षांपासून पावसाळा कमी होत असल्याने विहिरी व कुपनलिकांची पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. पाणीटंचाईमुळे अल्पमुदतीचे शेपू व पालक भाजीवर्गीय पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
विहिरींची जलपातळी दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत असल्याने खूपच कमी क्षेत्रफळात बागायत शेती दिसून येत आहे. बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय आहे. मात्र, हे पाणीही मे व जूनपर्यंत पूर्णत: टिकणार नसल्याने शेतकºयांनी विहिरी व कुपनलिकांच्या पाण्याचा अंदाज घेऊन कमी दिवसात येणाºया पालेभाज्यावर्गीय पिके घेण्यावर भर दिला आहे. सध्या पालक भाजी बाजारात विक्रीसाठी येत आहे.
दिर्घकालीन पिकांकडे पाठ
पाणीटंचाई असल्यामुळे उन्हाळी मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी, दादर, अशा दीर्घकालीन पिकांकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे. ज्या शेतकºयांकडे थोड्याफार प्रमाणात पाण्याची सोय आहे, असे शेतकरी सध्या अल्पमुदतीच्या पिकाची लागवड करीत आहेत.
शेपा व पालक हे प्रामुख्याने थंड वातावरणात किंवा थंडीच्या दिवसात घेण्याचे पीक असते. या दिवसात पिकाची जोमदार वाढ होत असते. मात्र, ज्या शेतकºयांकडे पाण्याची सोय असते असे शेतकरी पालक पीक वर्षभरही घेऊ शकतात. पालक लागवड केल्यानंतर पाच आठवड्यानंतर पालक काढणीस सुरुवात होते. कापडणे येथील काही शेतकरी सध्या शेपू, पालकची कापणी करून बाजारात विक्रीसाठी नेत आहेत. एकदा तयार झालेल्या पालक भाजीची कापणी झाल्यावर पुन्हा या पिकाला पाणी भरले तर आठ ते दहा दिवसानंतर परत पालक भाजी काढण्यासाठी तयार होत असते. असे पाच ते सहा वेळेस पुन्हा पुन्हा पालक भाजी काढणी करता येते. मात्र, सध्या पाणीटंचाई असल्याने येथील शेतकरी जेमतेम एक ते दोन वेळेस पालक पिकाचे उत्पादन घेत आहेत.
वर्षभर ग्राहकांकडून मागणी
आरोग्याच्या दृष्टिकोनातून पालक भाजीला वर्षभर ग्राहकांकडून पसंती असते. मात्र, या भाजीचे दर मागणी व पुरवठ्यानुसार कमी अधिक होत असतात. सध्या उन्हाळा असला तरी शेतकºयांनी उत्पादित केलेली पालक भाजी २० ते २५ रुपये किलोच्या दराने विक्री होत आहे. मात्र, पाणीटंचाई असल्याने पिकांची वाढ खुंटून पालक उत्पादनात घट येत आहे. परिणामी शेतकºयांना याचा आर्थिक फटका बसत आहे. जाणकार शेतकºयांनी सांगितले की, पालकचे पीक वर्षभर घेता येऊ शकते. बहुतांश पाण्याचा निचरा होणाºया शेतजमिनीत शेणखताची मात्रा योग्य असल्यास व पाणी मुबलक असल्यास पालक शेतीपासून दोन पैसे शेतकºयांच्या हाती येतात. पाणीटंचाईची समस्या असल्यामुळे ज्या शेतकºयांकडे जेमतेम पाण्याची सोय आहे, असे शेतकरी कमी पाण्यावर ठिबक सिंचनाच्या सहाय्याने सध्या भेंडी, ढेमसे, हिरवी काकडी, कारले, गिलके, वांगी, गवार अशी कमी दिवसात येणारी पालेभाज्यावर्गीय पिके घेताना दिसून येत आहेत.

Web Title: Short-term cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे