पिता पुत्राविरोधात निषेध मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:16 PM2019-05-09T22:16:27+5:302019-05-09T22:17:55+5:30

मारहाण प्रकरण : महापौर सोनार, देवा व भुषण सोनार वर मोक्का लावा 

Protest Protest against Father Son | पिता पुत्राविरोधात निषेध मोर्चा 

dhule

Next
ठळक मुद्देdhule

धुळे : शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ गुरूवारी शिवसेनेतर्फे  मोर्चा काढला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह नगरसेवक देवेंद्र सोनार व भुषण सोनार आणि त्यांच्या समर्थकांवर मोक्का  लावण्याची मागणी करण्यात आला. मोर्चात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि जुने धुळे परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या. 
शहरातील मालेगावरोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात आला़ यावेळी शिवसेनेचे माजी आमदार प्रा़शरद पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख संजय गुजराथी, नरेंद्र परदेशी, महेश मिस्त्री, पंकज गोरे, गुलाब माळी, सागर कांबळे, विजय भट्टड, कैलास पाटील, शाना सोनवणे, देवा लाणारी, डॉ़ सुशिल महाजन, हेमा हेमाडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते़ 
शिवाजी पुतळ्यापासुन आग्रारोड, झाशी राणी चौक, मनपा इमारतीजवळून क्युमाईन क्लबजवळ पोहचला़ यावेळी माजी आमदार प्रा़शरद पाटील यांनी जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यावरील भ्याड हल्याचा तिव्र शब्दात निषेध केला़ 


महापौर चंद्रकांत सोनार,  नगरसेवक देवा सोनार, भुषण सोनार, नरेंद्र सोनार, टिंक्या बडगुजर तसेच अन्य साथीदारांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाºया गुंडांचा वेळीच बंदोबस्त झाला नाही़ तर भविष्यात अडचण निर्माण होईल, असे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

सामाजिक राजकीय जीवणात काम करू नये, यासाठी गावगुडांकडून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे़ मोराणे येथील जवाहर सुतगीरणीतील कामगारांच्या बाजुने हिलाल माळी यांनी आवाज उठवला आहे़ त्यामुळे नाराज होऊन आमदार कुणाल पाटील यांनी महापौर सोनार यांना हातीशी धरुन हे कृत्य केल्या असल्याचा आरोप निवेदनात हिलाल माळी यांनी केला आहे.  या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुन संशयित आरोपींसह जबाबदार लोकांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

पोलीस अधीक्षक भाजपाच्या दबावात 
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे भाजपाच्या पदाधिकाºयांना खतपाणी घालुन शहर अस्वस्थ करण्याचे काम करीत आहे़  पोलिस अधीक्षकांवर सत्ताधाºयांचा दबाव आहे़ महापौर चंद्रकांत सोनार आणि त्याचा मुलगा नगरसेवक देवा सोनार हे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने दबावाला बळी न पडू नये़ अन्यथा शहरात उदभवणाºया  गंभीर परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे़ 
 

Web Title: Protest Protest against Father Son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे