Dhule Municipal Election 2018 : मनपा निवडणुकीसाठी आज मतदान, अफवांचे पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:25 PM2018-12-08T20:25:16+5:302018-12-09T12:44:03+5:30

 पैसे वाटपाच्या संशयावरुन एकावर चाकू हला,तर एकाला ४९ हजारासोबत एकाला पकडले

Polling, rumors, crop | Dhule Municipal Election 2018 : मनपा निवडणुकीसाठी आज मतदान, अफवांचे पीक

Dhule Municipal Election 2018 : मनपा निवडणुकीसाठी आज मतदान, अफवांचे पीक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मनपा निवडणुकीच्या ७४ जागांसाठीच्या ३५५ उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद होणार आहे. दरम्यान, मतदानाच्या आदल्यादिवशी आमदार अनिल गोटे  आणि भाजपचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्याकडून पत्रकार परिषदेतून आरोप - प्रत्यारोप करण्यात आले. तर  पैसे वाटपाच्या संशयावरुन दोन जणांवर चाकू हल्ला आणि सायंकाळी  मनपाच्या प्रभारी पथकाने ५९ हजाराच्या रक्कमेसह एकाला पैसे वाटप करण्याच्या संशयावरुन पकडल्याची घटना घडल्याने शहरात अफवांचे पीक पसरले आहे.
धुळे महापालिका निवडणुकीसाठी रविवारी १९ प्रभागातून ७४ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीत एकूण ३५५ उमेदवार रिंगणात उभे आहेत. निवडणुकीत भाजप विरोधात आमदार अनिल गोटे यांचे लोकसंग्राम, राष्ट्रवादी - काँग्रेस आघाडी आणि शिवसेना अशी लढत होत आहे. भाजपविरोधात सर्वच पक्ष एकवटले आहे.
आमदारांचा आरोप - शनिवारी दुपारी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेतून निवडणुकीत भाजपकडून पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप केला. तसेच पैसे वाटप करणाºयाला पकडले तर लोकसंग्रामच्या दोन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तो गुन्हा मागे नाही घेतला तर आपण उपोषणाला बसू असा इशारा दिला. तसेच आपण राजीनामा देणार नाही. आता पक्षाने मला काढावे, मग मी सांगेल की मी गुंडगिरीविरोधात बोललो म्हणून मला पक्षाने काढले, असेही आमदार गोटे म्हणाले.
दोन जणांवर चाकू हल्ला - शनिवारी पहाटे नकाणे रोडवर गोकर्ण सोसायटीत   पैसे वाटप करीत असल्याच्या संशयावरुन दोन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला. याप्रकरणी जखमींनी दिलेल्या फिर्यादीवरुन लोकसंग्रामच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला पकडले- सायंकाळी मिल परिसरातील समता नगरात महापालिकेच्या भरारी पथकाने पैसे वाटपाच्या संशयावरुन एकास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याबरोबर असलेले दोन ते तीन जण फरार झाले.  संशयिताकडे ४९ हजार रोख आणि मतदारांची यादी आढळून आली आहे. संशयिताला शहर पोलीस स्टेशनला आणले आहे.
 

Web Title: Polling, rumors, crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.