Nudal nagav nagala security guard raided murder | धुळ्यानजिक नगावला सुरक्षा रक्षकाची निर्घुण हत्या

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील नगाव येथील मॉलमध्ये सुरक्षा रक्षकाचा झाला खूनमारेकºयांनी टेम्पोसह चोरुन नेल्या टाईल्सघटनास्थळी तातडीने पोलीस दाखल्, तपासाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील नगाव येथील श्याम बिल्डींग मॉलमध्ये कार्यरत असलेल्या वॉचमनची डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन निर्घुण हत्या करण्यात आली़ मारेकरी तीन असल्याचा संशय असून टेम्पोसह टाईल्स घेवून ते पळून गेले आहेत़ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली़ 
मुुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील नगाव येथे आदित्य अग्रवाल यांचे श्याम बिल्डींग मॉल आहे़ या मॉलच्या सुरक्षिततेसाठी नगाव येथील रामदास शिवराम पाटील (६८) हे कामाला आहेत़ गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून नित्यनेमाने पाटील आपली सेवा देत आहेत़ सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास चोरटे याठिकाणी दाखल झाले़ त्यांनी पाटील यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला़ त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला़ घटनास्थळावरुन सुमारे ३ लाखांचा एमएच १८ एए ४५६३ क्रमांकाचा टेम्पो आणि ९० ते १ लाखांच्या १५० ते २०० टाईल्स चोरीला गेल्या आहेत़ 
मॉलच्या आवारात पाटील यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता़ त्यामुळे ही घटना मंगळवारी सकाळी उजेडात आली़ घटनेचे वृत्त कळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता भांड या पोलीस फोजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्या़ श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते़ प्राथमिक तपास केला असता मारेकरी सोनगीरच्या दिशेने पळून गेल्याचा संशय व्यक्त होत आहे़ रामदास पाटील यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे़