नवीन इमारतीत स्वतंत्र ‘फायर सिस्टिम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:27 AM2017-08-03T00:27:11+5:302017-08-03T00:31:36+5:30

महापालिका : पंप हाऊससह इमारतीच्या चारही बाजूस अत्याधुनिक ‘हायड्रंट’ यंत्रणा बसविणार

A new 'Fire System' in the new building! | नवीन इमारतीत स्वतंत्र ‘फायर सिस्टिम’!

नवीन इमारतीत स्वतंत्र ‘फायर सिस्टिम’!

googlenewsNext
ठळक मुद्देअग्निशमन विभागाच्या यंत्रणेसाठी २० ते २५ हजार लीटरची स्वतंत्र पाण्याची टाकीआगीच्या ७९ घटना

लोकमत न्यूज नेटवर्क 
धुळे : मनपाची नवीन प्रशासकीय इमारत सध्या शाळा क्रमांक एकच्या जागेत आकारास येत आहे़ या इमारतीत स्वतंत्र व अत्याधुनिक ‘फायर सिस्टीम’ बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ ‘फायर हायड्रंट पंप सिस्टीम’ इमारतीत बसविली जाणार असल्याने चारही बाजूने इमारत अग्नीउपद्रवापासून सुरक्षित राहणार आहे़
इमारतीचे काम पूर्णत्वास
मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम सध्या शाळा क्रमांक एकच्या जागेत सुरू आहे़ इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्णत्वास आले असून सध्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे तर फर्निचरच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे़ दरम्यान, मनपा अग्निशमन विभागानेदेखील नवीन इमारतीत ‘फायर सिस्टीम’ बसविण्याची तयारी केली असून त्यादृष्टीने तयारी सुरू आहे़ 
अग्निशमनचे ५ बंब
अग्निशमन दलाकडे सध्या पाच मोठे बंब असून १ जीप आहे़ त्यात एका बंबाला एप्रिल महिन्यात अपघात झाला होता, त्याची दुरुस्ती लवकरच केली जाणार आहे़ तर जुन्या २ बंबांचे व १ टँकरचा लवकरच लिलाव केला जाणार आहे़ अग्निशमन विभागात ३५ कर्मचारी कार्यरत आहेत़ त्यात १ सहायक अग्निशमन अधिकारी, ३ लिडींग फायरमन, १० फायरमन, ४ क्लिनर, १६ चालक व १ आॅपरेटरचा समावेश आहे़  
नवीन कार्यालय हवे!
सध्या अग्निशमन विभागाचे कार्यालय शिवाजी रस्त्यावरील पांझरा जलकेंद्रालगत आहे़ परंतु त्याठिकाणी बंब लावण्यासाठी आवश्यक जागा व कर्मचाºयांना बसण्यासाठी, अग्निशमनचे साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने या कार्यालयाचे नूतनीकरण करण्याची मागणीही अग्निशमन विभागाची आहे़ 
आगीच्या ७९ घटना
एप्रिल ते जुलै या चार महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण ७९ आगीच्या घटनांची नोंद झाली आहे़

 

नवीन प्रशासकीय इमारतीत प्रस्तावित ‘फायर सिस्टीम’़़
पंप हाऊस- तीन पंप कार्यरत केले जातील़
पाण्याची टाकी- अग्निशमन विभागाच्या यंत्रणेसाठी २० ते २५ हजार लीटरची स्वतंत्र पाण्याची टाकी असेल़
हायड्रंट/ यार्ड हायड्रंट सिस्टीम- सदर यंत्रणेव्दारे इमारतीच्या चारही बाजूस पाईप टाकलेले असतील़  सदर पाईपचा व्हॉल्व पंप हाऊसला जोडलेला असेल़ त्यामुळे अग्निउपद्रवात तत्काळ पाण्याची फवारणी होऊ शकते़ 
स्मोक डिटेक्टर- धूर निर्माण झाल्यास त्याची माहिती मिळणार असल्याने आगीची माहिती वेळीच मिळू शकेल़  
फायर अलार्म- नवीन प्रशासकीय इमारतीत फायर अलार्मही बसविला जाणार आहे़ 
स्प्रिंकलर सिस्टीम- नवीन इमारतीत स्प्रिंकलरही बसविले जाणार आहेत़ 
फायर इस्टिंग्युशर- नवीन इमारतीच्या प्रत्येक भागात अग्निरोधक यंत्रही बसविण्यात येणार आहे़

Web Title: A new 'Fire System' in the new building!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.