दोंडाईच्यात एकाचे दीड लाख लुटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:37 AM2018-09-27T11:37:58+5:302018-09-27T11:39:35+5:30

खळबळ : नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

Looted one and a half million in Dondaicha | दोंडाईच्यात एकाचे दीड लाख लुटले 

दोंडाईच्यात एकाचे दीड लाख लुटले 

Next
ठळक मुद्देदोंडाईचा उड्डाण पुलाजवळील घटनानागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दोंडाईचा येथे एकाकडून दीड लाख रुपये लुटून नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ दरम्यान, घटनेची अद्याप दोंडाईचा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेली नाही़ शहादा रोडवर असलेल्या दोंडाईचा उड्डाण पुलाजवळ बुधवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली़ अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्याने एका मोबाईल विक्रेत्याकडील दीड लाखांची रक्कम घेऊन पोबारा केला़ आरडा-ओरड करुनही त्याचा काहीही उपयोग झाला नाही़  या घटनेमुळे परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ 

Web Title: Looted one and a half million in Dondaicha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.