शहरातील बाजारपेठेत होळीसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:28 PM2019-03-15T22:28:48+5:302019-03-15T22:29:10+5:30

पूर्वतयारी : मंडळांकडून नियोजनाला सुरूवात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

Long time for the city's market for Holi | शहरातील बाजारपेठेत होळीसाठी लगबग

dhule

Next

धुळे : होळीनिमित्त शहरातील प्रमुख चौकांमध्ये हार-कंगण विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली आहेत. तर कंगण-हारांना विक्रेत्यांकडून साहित्य बनविण्यात येत आहे़ यावर्षी हार-कंगणाचे दर अवाक्यातच असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
होळी व धूलिवंदन सण धुळे शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा यंदाही कायम ठेवत धुळे शहरातील गल्ली क्रमांक ६ मधील स्वतंत्र भांग्या मारूती मित्र मंडळ, वाडी भोकररोडवरील उत्तरमुखी मारूती मित्र मंडळ व अन्य मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. जुन्या धुळ्यातील काही भागात पताका व चौक सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्यात होते. तर धूलिवंदन सणाच्या दिवशी डिजेच्या तालात पाण्याच्या शॉवरखाली तरुणाईला नाचण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा; यासाठी जुन्या धुळ्यात शॉवर लावण्याचे काम सुरू होते. धूलिवंदन सण सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील बाजरपेठेत विक्रेत्यांनी पिचकारी व रंग विक्रीसाठी दुकाने थाटली असून विक्रेत्यांकडे खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. दरम्यान, हे सण उत्साहात साजरा करण्यासाठी शहरातील मंडळांचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्यानुसार कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
पिचकाऱ्या उपलब्ध
शहरातील फुलवाला चौक, महात्मा गांधी पुतळा व पाचकंदील चौकात विक्रेत्यांनी थाटलेल्या दुकानांवर १० ते ९०० रुपयापर्यंतच्या पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. या पिचकाऱ्यांमध्ये नानाविध व्हरायटी आल्याने विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या चित्तवेधक पिचकाºयांचे लहान मुलांना विशेष आकर्षित करित पिचकाºयांसोबत तरुणाईला ‘डोलची’ ची विशेष क्रेझ दिसत असून ५० ते १२० रुपयांपर्यंत ‘डोलची’ ची विक्री विक्रेत्यांकडे होत आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन
होळी रंगपंचमी सनानिमित्त शहरातील विविध मंडळाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले़ त्यासाठी तयारी देखील केली जात आहे़ दरम्यान सुटीचा आनंद घेण्यासाठी पिकनिक, पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे़
पोलीस प्रशासनाकडून दक्षता
आचार संहिता, होळी व रंगपंचमीच्या काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे़

Web Title: Long time for the city's market for Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे