धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ८५ शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:42 AM2017-11-25T11:42:46+5:302017-11-25T11:43:45+5:30

जिल्हा मध्यवर्ती बॅँक : दुस-या यादीची शेतकºयांना प्रतीक्षा

Loan remuneration to 85 farmers of Dhule and Nandurbar districts | धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ८५ शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ

धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ८५ शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ

googlenewsNext
ठळक मुद्देकर्जमाफीसाठी पहिल्या यादीत पात्र ठरविण्यात आलेल्या २,४४५ पैकी आतापर्यंत केवळ जिल्हा बॅँकेच्या ८५ शेतकºयांची कर्जमाफी जाहीर झाली आहे. अजून २३६० शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शासनातर्फे कर्जमाफीसाठी दुसरी यादीही लवकरच जाहीर करण्याचे सांगण्यात आले होते.मात्र, दुसरी यादी अद्याप ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर जाहीर झालेली नाही. यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत पहिल्या ग्रीन (कर्जमाफीसाठी पात्र) २,४४५ शेतकºयांची नावे जाहीर केली होती. पैकी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या ८५ कर्जदार शेतकºयांची कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली. दरम्यान, कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या दुसºया यादीची प्रतीक्षा आहे. 
शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकºयांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर शासनाने आॅनलाइन या किचकट प्रणालीद्वारे शेतकºयांचे अर्ज स्वीकारले.
 या कठीण परिस्थितीतही जिल्ह्यातील ९१ हजार ८६८ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. त्यानुसार शासनाने पहिली ग्रीन यादी (पात्र शेतकरी) जाहीर झाली. 
या यादीत २,४४५ शेतकºयांची नावे होती. त्यात धुळे तालुका २४३, साक्री ४६७, शिंदखेडा १००७ व शिरपूर ७२८ शेतकरी पहिल्या यादीत पात्र ठरले होते.
धुळे जिल्ह्यातील फक्त १४ शेतकºयांचा समावेश 
पहिल्या यादीत २ हजार ४४५ शेतकºयांची नावे जाहीर केल्यानंतर यात जिल्हा बॅँकेच्या ८५ कर्जदार शेतकºयांची नावे होती. त्यात धुळे जिल्ह्यातील १४ व नंदुरबार जिल्ह्यातील ७१ शेतकºयांचा समावेश होता. या शेतकºयांना कर्जमाफीसाठी आवश्यक असलेले २८ लाख ५० हजार ३१७ रुपयांचा निधी जिल्हा बॅँकेला गेल्या महिन्यातच शासनाकडून प्राप्त झाला होता. त्यानंतर कर्जदार शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी करून जिल्हा बॅँकेच्या ८५ कर्जदार शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली आहे.


 पहिल्या यादीत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या यादीत जिल्हा बॅँकेच्या ८५ शेतकºयांची नावे होती. त्यासाठी शासनाकडून निधीही मिळाला होता. त्यानुसार संबंधित शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली असून अद्याप दुसरी यादी जाहीर झालेली नाही.     - धीरज चौधरी,
     मुख्य कार्यकारी अधिकारी,
     धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बॅँक 

Web Title: Loan remuneration to 85 farmers of Dhule and Nandurbar districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.