खया गुन्हेगारांचा शोध घेण्यात यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 09:36 PM2019-06-13T21:36:27+5:302019-06-13T21:36:57+5:30

पुतळा विटंबना प्रकरण  : मोरदडच्या ग्रामस्थांनी अपर पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

Khayyad criminals should be searched | खया गुन्हेगारांचा शोध घेण्यात यावा

पोलीस अधिकाºयांशी चर्चा करतांना मनोज मोरे यांच्यासह मोरदड येथील ग्रामस्थ

Next

धुळे : तालुक्यातील मोरदड येथे पुतळा विटंबना करणाºयांना कठोर शिक्षा देण्यात यावी. त्याचबरोबर निरपराधांचा छळ थांबवावा. या प्रकरणातील खºया गुन्हेगारांचा शोध घ्यावा अशी मागणी मोरदड ग्रामस्थांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्याकडे आज केली. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होणे ही निषेधार्ह बाब आहे. मोरदड गावात काहीजण शांतता भंग करण्याचे काम करीत असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. 
मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोरदडच्या ग्रामस्थांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. तसेच आपले सविस्तर म्हणणे पोलीस अधिकाºयांसमोर मांडले.
 यावेळी गोविंदा पाटील, सुभाष दगा पाटील, कुलदीप पाटील, सागर पाटील, गोरखनाथ पाटील, पुष्पाबाई पाटील, एकनाथ पाटील, रावसाहेब पाटील, माधवराव पाटील, सुशिलाबाई पाटील, लाडकाबाई पाटील, विद्याबाई पाटील, विलास पाटील, महेंद्र पाटील, निर्मला पाटील, रमेश पाटील, आशाबाई पाटील, वाल्मीक पाटील, अनिल पाटील, यांच्यासह चारशेपेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.  त्यांच्यासमवेत मराठा क्रांती मोर्चाचे निंबा मराठे, राजू महाराज, अर्जून पाटील हे देखील उपस्थित होते.  

Web Title: Khayyad criminals should be searched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे