लोखंडी पाईपने एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:24 PM2019-02-24T22:24:50+5:302019-02-24T22:25:49+5:30

शंभर फुटीरोडवरील घटना : तिघांविरुध्द गुन्हा दाखल

Iron pipe strikes alone | लोखंडी पाईपने एकास मारहाण

dhule

Next

धुळे : काहीतरी क्षुल्लक कारणावरुन एकाला शिवीगाळ करीत लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री घडली़ या प्रकारामुळे शंभरफुटी रोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़
शहरातील शंभरफुटी रोडवर बिलाल मशिदजवळ राहणारा रशिद शेख गफार (३०) हा तरुण मजुरी करुन स्वत:चा आणि परिवाराचा उदरनिर्वाह भागवितो़ तो राहत असलेल्या घराजवळ काहीतरी क्षुल्लक कारणावरुन त्याला शिवीगाळ करण्यात आली़ एवढ्यावरच न थांबता त्याला लोखंडी पाईपाने आणि हाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली़ यात त्याला जबर दुखापत झाली़ मारहाणीची ही घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली़ अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली़ जीवे ठार मारण्याची धमकी देवून मारेकरी त्याला जखमी अवस्थेत तिथेच टाकून रवाना झाले़
घटनेचे गांभिर्य बघून रशिद शेख याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी रशिद शेख गफार याने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविली़
त्यानुसार, इरफान मुसा मन्सुरी, आरीफ मुसा मन्सुरी आणि शरीफ मुसा मन्सुरी (रा़ जामचा मळा, धुळे) यांच्या विरोधात संशयावरुन भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पोलीस हेड कॉन्स्टेबल बी़ एच़ पाटील घटनेचा तपास करीत आहेत़ मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे़

Web Title: Iron pipe strikes alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे