धुळे येथील तंत्रप्रदर्शनात नावीन्यपूर्ण उपकरणांनी वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:27 AM2019-03-19T11:27:56+5:302019-03-19T11:29:05+5:30

मीनी बॉटल कुलर उपरणाला प्रथम क्रमांक

Innovative attention is given by the innovative devices in Dhule | धुळे येथील तंत्रप्रदर्शनात नावीन्यपूर्ण उपकरणांनी वेधले लक्ष

धुळे येथील तंत्रप्रदर्शनात नावीन्यपूर्ण उपकरणांनी वेधले लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देआयटीआयमध्ये तंत्रप्रदर्शन१७ आयटीआयमधून ५२ उपकरणे मांडलेविजेत्यांना बक्षीस

आॅनलाइन लोकमत
धुळे : येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयात आज जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात खाजगी व शासकीय अशा १७ आयटीयायमधील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना आंतरमशागत करण्यासाठी उपयुक्त ठरणारे मिनी ट्रॅक्टर, स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरणारे यंत्र, पाण्याच्या ड्रमचा वापर करून तयार केलेले कुलर आदी कौशल्यपुरक उपकरणांनी लक्ष वधून घेतले. दरम्यान सायंकाळी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात धुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मीनी बॉटल कुलर’ या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला.
निमित्त होते जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे. कौशल्य विकास व उद्योजगता विभाग महाराष्टÑ राज्य अंतर्गत व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण संचालनालय संचलित या प्रदर्शनाचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हे प्रदर्शन आयोजित केले होते.
जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी व्ही.एम.राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी आयटीआयचे प्राचार्य एम. के.पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व्यवसाय,प्रशिक्षण कार्यालयाचे निरीक्षक सी . डी. भोसले, शिवाजी संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. एम. जे.गर्दे, प्रा. एस. व्ही.पवार, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. एम. आर. चौधरी, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अ‍े. जी.कोकणी, उपअभियंता सलमान अन्सारी, शिंदखेडा आय टीआयचे प्राचार्य एम. एस. दे, व्ही.डी. सिसोदे,सुकापूर आयटीआयचे प्रा.एस.बी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या तंत्रप्रदर्शनात जिल्हाभरातील शासकीय, खासगी अशा १७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उपकरणे मांडली आहेत. प्रदर्शनात अनेक विद्यार्थ्यांकडून चांगले उपकरणे कौशल्यपूर्वक तयार करण्यात आली आहे. त्यात साक्री आयटीआयच्या विद्यार्थ्यांकडून शेतक?्यांना अंतमशागत करण्यासाठी उपयुक्त ठरणारे मिनी ट्रॅक्टर ५० हजारात तयार केले गेले आहे. तर सुकापूरच्या अविनाश ठाकरे, कन्हैय्या चौरे यांनी स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरणारे यंत्र, पाण्याचा ड्रमचा वापर करीत तयार केलेले कुलर, साक्रीच्याच राहुल सोनवणे, तुषार पाटील, दिनेश खैरनार यांच्याकडून मिनी पवनऊर्जा युनिट, भंगार साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या यंत्राच्या छोट्या प्रतिकृती आदी तंत्रप्रदर्शनात लक्षवेधक ठरल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणाचे परीक्षण एम.जे. गर्दे, एस.व्ही.पवार, एम. आर. चौधरी, सलमान अन्सारी, एस.जी.कोकणी, सी.डी. भोसले यांनी केले.
प्रास्ताविक उपप्राचार्य पी. एस.एन जैन यांनी तर सूत्रसंचालन गटनिर्दर्शक मारूती उपरे यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा.एस.आर.गवांदे यांनी मानले.
तंत्रप्रदर्शन यशस्वीतेसाठी प्राचार्य एम.के.पाटील, उपप्रचार्य पी.एस. जैन, ए.एस. शहा, गटनिदेशक एन.ए. कुळकर्णी, एन.सी.देवरे, एस.आर.गवांदे, एस.बी. परदेशी, निदेशक दिलीप सैंदाणे, यांच्यासह सर्व शिल्प निदेशक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

Web Title: Innovative attention is given by the innovative devices in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.