धुळे तालुक्यात चारा प्रक्रिया प्रत्याक्षिकास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:38 AM2019-02-14T11:38:27+5:302019-02-14T11:39:48+5:30

जि.प.च्या कृषी विभागाचा उपक्रम : कावठी येथे झाला कार्यक्रम

Initiative of fodder process in Dhule taluka | धुळे तालुक्यात चारा प्रक्रिया प्रत्याक्षिकास सुरूवात

धुळे तालुक्यात चारा प्रक्रिया प्रत्याक्षिकास सुरूवात

Next
ठळक मुद्देचारा प्रक्रिया प्रात्याक्षिकासाठी जिल्ह्यातील १६ गावांची निवडचारा टंचाईवर मात करण्याचा प्रयत्नपशुपालकांना दिली जाते आहे माहिती

आॅनलाइन लोकमत
धुळे : चारा प्रक्रिया प्रात्याक्षिकांसाठी प्रत्येक तालुक्यातील चार या प्रमाणे १६ गावांची निवड करण्यात आली आहेत. या उपक्रमाची सुरूवात धुळे तालुक्यातील मौजे कावठी येथुन करण्यात आली.
धुळे जिल्हा यावर्षी दुष्काळाचा सामना करीत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने, रब्बी हंगामात पुरेशा प्रमाणात पेरणी झाली नाही. त्यामुळे पशुधनास चारा पुरविण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. यावर मात करण्यासाठी पर्यायाने उपलब्ध चाऱ्यावर प्रक्रिया करून त्यास सकस करण्यासाठी प्रात्याक्षिकांचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने हाती घेतला आहे.
या चारा प्रक्रिया प्रत्याक्षिकाचा शुभारंभ १२ रोजी मौजे कावठी येथे प्रगतीशील शेतकरी मच्छिंद्र पाटील यांच्या शेतात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी धुळे पंचायत समितीचे उपसभापती दिनेश भदाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रल्हाद सोनवणे, पंचायत समिती सदस्य संजय शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी रोहन भोसले उपस्थित होते.
यावेळी प्रात्याक्षिकांचे उद्देश पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेशकुमार चौधरी यांनी स्पष्ट केला. प्रल्हाद सोनवणे यांनी प्रात्याक्षिक मालिकांचे नियोजन, गरज, फायदे व महत्व शेतकºयांना पटवून सांगितले.
कार्यक्रमाला जिल्ह्यातील चारही पंचायत समितीचे कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच कावठी गावातील शेतकरी रामकृष्ण पाटील, देवीदास नेरकर, संजय पाटील, मुरलीधर पाटील, अशोक पाटील, चव्हाण, मस्के आदी उपस्थित होते. दरम्यान या प्रात्याक्षिक प्रक्रियेसाठी १६ गावांची निवड झालेली आहे.

 

Web Title: Initiative of fodder process in Dhule taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे