धुळयात लोकप्रतिनिधींकडून रस्त्याच्या कामांवर सर्वाधिक भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:55 AM2018-02-18T11:55:12+5:302018-02-18T11:56:13+5:30

महापालिका, बांधकाम विभागामार्फत कोट्यवधीची कामे सुरू

The highest emphasis was on the work of the people from Dhan Dhan | धुळयात लोकप्रतिनिधींकडून रस्त्याच्या कामांवर सर्वाधिक भर

धुळयात लोकप्रतिनिधींकडून रस्त्याच्या कामांवर सर्वाधिक भर

Next
ठळक मुद्दे-सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून रस्त्याच्या कामांना प्राधान्य-महापालिकेची निवडणूक केवळ दहा महिन्यांवर-राज्य नगरोत्थान, विशेष रस्ते अनुदान, विशेष निधीतून रस्त्यांची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेची निवडणूक अवघ्या दहा महिन्यांवर आल्याने मनपासह सर्व लोकप्रतिनिधींनी शहरात रस्ता कामांचा धडाका लावला आहे़ महापालिका, बांधकाम विभागाकडून कोट्यवधींची रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत़
विशेष अनुदानातील कामे
शहरात राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेतून ४३ कोटींची रस्त्यांची कामे मार्गी लागल्यानंतर आता महापालिकेने २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षासाठी मिळालेल्या दीड कोटी रुपयांच्या विशेष रस्ता अनुदानातून नऊ रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत़ त्यात प्रभाग क्रमांक ६ मधील प्रमोद नगर भागातील मारोती मंदिर ते नाल्यापावेतोचा रस्ता (अंदाजित रक्कम- ९ लाख ९६ हजार ८४), प्रभाग क्रमांक ३४ मधील रेल्वेगेट ते रिक्षा स्टॉपपर्यंतचा मुख्य रस्ता (२० लाख २ हजार ११५), टॉवर बगिचा ते ताशागल्ली (१९ लाख ९० हजार २५६), त्र्यंबक नगर व जगन्नाथ नगरातील रस्ते (१४ लाख ९७ हजार ७१९), घड्याळवाली मस्जिद ते किसन बत्तीवाला खुंट (१५ लाख ६ हजार ७३९), प्रभाग क्रमांक ३३ मधील विविध भागात रस्ते डांबरीकरण करणे (१५ लाख १ हजार १२३), चाळीसगाव रोड अभय नगर परिसर रस्ता (२० लाख १ हजार ४६०), सुभाष पुतळा ते खुनी मस्जिद पर्यंतचा रस्ता (१५ लाख ९ हजार ४१७), झणझणी माता मंदिर ते गढीपावेतोच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण (१४ लाख ५७ हजार ७००) ही कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत़ तर दुसरीकडे नगरसेवकांकडूनदेखील आपापल्या प्रभागात जिल्हास्तरीय नगरोत्थान योजना, दलित वस्ती सुधार योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून रस्त्याच्या कामांवर भर दिला जात आहे़
नदीकाठचे रस्ते प्रगतिपथावर
शहरात मनपाकडून रस्ता कामांवर भर दिला जात असतांना दुसरीकडे आमदार अनिल गोटेंच्या संकल्पनेतून प्रस्तावित पांझरा नदीपात्राच्या दोन्ही बाजूस साडेपाच किमीचे रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे़ ६५ कोटी २३ लाख ५७ हजार रुपयांच्या खर्चातून नदीपात्रात रस्ता व ब्रिज कम बंधाºयांचे काम सुरू आहे़ त्याचप्रमाणे साक्रीरोडच्या रूंदीकरणाचे काम बांधकाम विभागाकडून लवकरच हाती घेतले जाणार आहे़
रेल्वेस्टेशन रस्त्यासाठी निधी
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने नुकताच लेनिन चौक ते दसेरा मैदान या रस्त्याच्या कामासाठी १० कोटींचा विशेष निधी मंजूर झाला आहे़ त्यामुळे रेल्वेस्टेशन रस्त्याचे मोठे काम त्यामुळे मार्गी लागणार आहे़ तसेच गजानन कॉलनीतील नाल्याला संरक्षण भिंतीचे कामही त्यातून होणार आहे़


 

 

Web Title: The highest emphasis was on the work of the people from Dhan Dhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.