आयुष्याला पुर्णत्व देण्यासाठी गुरूचा मोठा मिळाला आधार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:16 PM2019-07-16T12:16:19+5:302019-07-16T12:16:43+5:30

राजेंद्र भारूडे : आई, गुरू आणि ज्याच्या सहवासात राहिलो त्या निसर्गाची मिळाली साथ

Guru's big auspicious ground for completing life | आयुष्याला पुर्णत्व देण्यासाठी गुरूचा मोठा मिळाला आधार 

राजेंद्र भारूडे यांच्यासोबत आई कमलबाई भारुडे

Next

विशाल गांगुर्डे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील सामोडे गावात वाढतांना कधी मी आयएएस होण्याचे स्वप्न बघितले नव्हते, आज सोलापुर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन काम करतांना जवळच्या, लहान पणातील आठवण व गुरूजीची शिकवण कधी विसरू शकत नाही़ 
गुरूजींच्या या शिकवणीचा सर्वात मोठा वाटा आहेत तो, त्यांच्या निस्वार्थ भावनेने केलेले प्रेम आणि कलेला भक्कम पाया माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरणारी आहे़ मानसाने माणसासारखे वागावं,जाती धर्माच्या काठीने बघु नये, त्यामुळे लहानपणाच शिक्षण सार्वजनिक शाळेत झाल म्हणुन प्राथमिक शिक्षणाचा पाया शिक्षकांमुळे पक्का होऊ शकला़ 
दुसरे जे शिक्षक म्हणजे माझी आई : जी स्वत: काबाडकष्ठ करून पहाटे चार वाजता उठायची घरातील सर्वकामे, दारू गाळ्ण्यापासुन, मुलांना तयार करण्यापासुन स्वयंपाक करतांना आईला कधी थकवा आला नाही, आजार जाणवला नाही़ त्यामुळे आम्हालाही तशी स्वयस्पुर्ती, प्रेरणा कितीही दु: ख असले मानसाने त्या दु:खाचा बाहू न करता त्याला सक्षमपणे झुंज कधी देत राहावी याच एक उत्तम उदाहरण हे घरीच पहायला मिळाले होते़   
तिसरे गुरू म्हणजे निसर्ग आजच्या जगात नदी असतील उदा आमची जामखेली नदी, डोंगर असतील व राणमळा असेल किंवा मित्रासोबत जाऊन डोंगरावर फिरने, चढणे असेल यासर्व गोष्ट्री मनामध्ये कुठेतरी पुर्णत्वाची भावना देत होती ती आज शहरी भागात मिळत नाही़ 
पाणी नदी हटलं खेळण आलचं त्यात कृतीम खेळण्याची गरज पडली नाही़ मित्रांसोबत खेळणे असले, झाडावर चढणे, डोंगरावर चढणे यासर्व गोष्टी मनामध्ये व्यापतात निर्माण करत होती़ म्हणुन ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये घरात परिवारात शिक्षक असतील किंवा आदर्श शिक्षक असतील आणि निसर्गामध्ये शिक्षक शोधत बसतील त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जडण-घडण नख्खीच होणार माझा विश्वास आहे़ असा मी घडलो, असे आपणही नक्कीच घडा व देशाची सेवा करा़ आयुष्यात मेहनत केल्याशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळविता येवू शकत नाही़ 
 

Web Title: Guru's big auspicious ground for completing life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे