पाणीटंचाईत गुरे जगविण्यासाठी तुषार सिंचनावर चारा पिकांची बागायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:13 PM2019-04-21T12:13:56+5:302019-04-21T12:14:21+5:30

शेतकयांचा खटाटोप । दुष्काळी परिस्थितीमुळे पशुपालक हैराण  पाणी, चाºयाअभावी गुरे काढली विक्रीला!

Fodder cultivation on Tushar irrigation to provide livestock to the farmers | पाणीटंचाईत गुरे जगविण्यासाठी तुषार सिंचनावर चारा पिकांची बागायत

dhule

Next
ठळक मुद्देdhule


कापडणे : पाणीटंचाईमुळे गुरांच्या चाºयाचा प्रश्न बिकट झाला आहे. यामुळे पशुपालक हैराण झाले आहेत. पाणीटंचाईत गुरांना जगविण्यासाठी काही शेतकºयांनी तुषार सिंचनावर चारावर्गीय पिकाची लागवड केली आहे. 
कापडणेसह परिसरातील न्याहळोद, कौठळ, तामसवाडी, मोहाडी, धनुर लोनकुटे, दापुरा, दापोरी, सोनगीर, सरवड, देवभाने नगाव, धमाने, बिलाडी आदी गावात सलग तीन ते चार वर्षांपासून कमी पर्जन्यवृष्टी होत असल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पशुधनाला वाचविण्यासाठी पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईचे संकट निवारण करण्यासाठी शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. गेल्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे व परतीचा पाऊसही न झाल्यामुळे सर्वत्र नदी-नाले बांध, बंदिस्त विहिरी, कूपनलिकांमध्ये ठणठणाट आहे. सध्या उन्हाचा पारा ४१ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त वाढत असल्याने विहिरींची भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. जेमतेम कमी पाणी असूनही पशुधन जिवंत ठेवण्यासाठी शेतकºयांनी नियोजन करून ठिबक व तुषार सिंचनाद्वारे अगदी थोड्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली आहे.  शेतकरी दररोज पाणी व चारा टंचाईच्या समस्येशी सामना करताना दिसून येत आहेत.
येथील सर्वत्र विहिरी कूपनलिका पाण्याविना आटल्या आहेत. सरासरी एक-दोन टक्के शेतकºयांच्या विहिरींना जेमतेम अर्धा तासपेक्षाही कमी वेळ पाण्याचा उपसा होत आहे. असे शेतकरी आपल्याकडील गुरांना जिवंत ठेवण्यासाठी मका व दादर चाºयाची पेरणी करीत आहेत. आपल्याकडील विहिरीतील कमी पाण्याचे नियोजन करून ठिबक सिंचनद्वारे व तुषार सिंचनद्वारे चारा पिके जगविण्याचा खटाटोप करताना शेतकरी दिसून येत आहेत. शेतकºयांकडे साठविलेला चारा संपत आल्यामुळे जनावरांपुढे काय टाकावे, असा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे.

Web Title: Fodder cultivation on Tushar irrigation to provide livestock to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे