दरमहा पाच हजाराची मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:22 PM2019-04-15T12:22:51+5:302019-04-15T12:23:28+5:30

साक्री रोड : घरात घुसून मंगळसुत्र हिसकावले

Five thousand rupees per month ransomed | दरमहा पाच हजाराची मागितली खंडणी

दरमहा पाच हजाराची मागितली खंडणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पानटपरी चालवायची असेल तर दरमहा ५ हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा याद राखा अशी धमकी देवून महिलेच्या गळ्यातील सोनपोत हिसकावून घेतली़ ही घटना साक्री रोडवरील सिंचन भवनाजवळ रविवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी सोमवारी पहाटे तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ 
साक्री रोडवर योगेश पवार यांची गणेश नावाची पानटपरी आहे़ दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरुन पानटपरी नियमित सुरु ठेवायची असेल तर दर महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी खंडणी मागत वाद घालण्यात आला़ हा प्रकार योगेश पवार यांच्या साक्री रोडवरील सिंचन भवनासमोर असलेल्या घरात रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला़ एवढ्यावरच न थांबता खंडणीखोरांनी पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसुत्र बळजबरीने हिसकावून घेत तोडून घेवून गेले़ ते ६ हजार ५०० रुपये किंमतीची २ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र होते़ 
याप्रकरणी रुपाली योगेश पवार (३१, रा़ सिंचन भवनासमोर, साक्री रोड, धुळे) या महिलेने शहर पोलीस गाठले आणि आपबिती कथन केली़ त्यानंतर सोमवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, प्रेम शिरसाठ, नयन आणि निखिल (कोणाचेही पूर्ण नाव माहित नाही) या तिघांविरुध्द भादंवि कलम ४५२, ३९२, ३८५, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ 
पोलीस उपनिरीक्षक एस़ जे़ वळवी घटनेचा तपास करीत आहे़ घटनेतील संशियत फरार आहेत़ 

Web Title: Five thousand rupees per month ransomed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.